कर्णधार बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्टो यांनी तिसऱ्या दिवशी जलद रन करायला सुरूवात केली. 5 ओव्हरमध्येच त्यांनी 84 रनवरून टीमचा स्कोअर 100 रनपर्यंत पोहोचवला. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या नॉटिंघम टेस्टसारखीच बॅटिंग करण्याच्या इराद्याने हे दोघं मैदानात उतरले होते. किवींविरुद्ध या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 121 बॉलमध्ये 179 रनची पार्टनरशीप केली आणि अशक्य आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. भारताविरुद्धही या दोघांनी अशाच बॅटिंगला सुरूवात केली होती. भारतीय फिल्डरनीही दोन जीवनदान देऊन स्टोक्सला मदत केली.
Third time’s the charm for #TeamIndia 🙌🏽
Dropped twice on the field, #BenStokes finally gets caught in some much needed redemption for #Bumrah & #Shardul 😅
Tune in to Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN) & Sony Ten 4 (TAM/TEL) #ENGvINDLIVEonSonySportsNetwork #ENGvIND pic.twitter.com/EfTgin8LKv
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 3, 2022
36 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर शार्दुल ठाकूरने स्टोक्सचा हातातला सोपा कॅच सोडला. यानंतरच्या पुढच्या बॉलवर बेयरस्टोने फोर मारून 50 रनची पार्टनरशीप पूर्ण केली. याच्या 2 ओव्हरनंतर पुन्हा एकदा स्टोक्सला जीवनदान मिळालं. यावेळी बॉलर शार्दुल ठाकूर होता तर कॅच कर्णधार जसप्रीत बुमराहने सोडला.
शार्दुलच्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला स्टोक्सने पुढे येऊन मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल मिड ऑफला उभ्या असलेल्या बुमराहकडे गेला. हा कॅच पकडण्यात बुमराहला अपयश आलं. यानंतरच्या पुढच्याच बॉलला स्टोक्सने पुन्हा तीच चूक केली, यावेळी मात्र बुमराह सतर्क होता आणि त्याने कॅच पकडला. बेन स्टोक्स 36 बॉलमध्ये 25 रन करून आऊट झाला. तर बेयरस्टोने 140 बॉलमध्ये 106 रनची खेळी केली. बेयरस्टोने यात 14 फोर आणि 2 सिक्स ठोकले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#सटकसल #मळलय #दन #लईफलईन #पण #लरड #ठकरन #कल #कम #तमम #Video