
प्रातिनिधीक फोटो
न्यूझीलंडचा माजी ऑलराऊंडर क्रिस केर्न्स (Chris Cairns) याची प्रकृती चिंताजनक आहे. ऑस्ट्रेलियातल्या रुग्णालयात केर्न्स लाईफ सपोर्ट सिस्टीमवर (Life Support System) आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार 51 वर्षांच्या क्रिस केर्न्सच्या धमणीच्या आतमधला थर फाटला आहे.
मुंबई, 10 ऑगस्ट : न्यूझीलंडचा माजी ऑलराऊंडर क्रिस केर्न्स (Chris Cairns) याची प्रकृती चिंताजनक आहे. ऑस्ट्रेलियातल्या रुग्णालयात केर्न्स लाईफ सपोर्ट सिस्टीमवर (Life Support System) आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार 51 वर्षांच्या क्रिस केर्न्सच्या धमणीच्या आतमधला थर फाटला आहे. यानंतर त्याला मागच्या आठवड्यात कॅनबेराच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आलं आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतरही केर्न्सच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. यानंतर त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं आहे. केर्न्स याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोपही झाले, त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती खराब झाली. नंतरच्या काळात केर्न्सला बस धुण्याची कामं करावी लागली.
केर्न्स सध्या कॅनबेराच्या रुग्णालयात भरती आहे, पण त्याला सिडनीला हलवण्यात येणार आहे. न्यूझीलंडच्या या ऑलराऊंडरने 62 टेस्ट आणि 215 वनडे खेळल्या. 2000 साली विस्डनने केर्न्सची वर्षाच्या सर्वोत्तम 5 खेळाडूंमध्ये निवड केली. 2004 साली 200 विकेट आणि 3 हजार रन करणारा तो जगातला सहावा खेळाडू ठरला.
1989 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या केर्न्सने 62 टेस्टमध्ये 3,320 रन आणि 215 वनडेमध्ये 4,950 रन केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केर्न्सच्या नावावर 9 शतकं आणि 48 अर्धशतकंही आहेत.
बॉलिंगमध्येही केर्न्सने उत्कृष्ट कामगिरी केली होती. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 218 विकेट आणि वनडेमध्ये 201 विकेट घेतल्या. टेस्टमध्ये त्याने 15 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि एकदा मॅचमध्ये 10 विकेट घेतल्या. केर्न्सच्या स्थानिक क्रिकेटचे आकडे एकत्र केले तर त्याने 21 हजारपेक्षा जास्त रन आणि 1100 पेक्षा जास्त विकेट घेतल्या.
निवृत्त झाल्यानंतर क्रिस केर्न्सवर टीमच्या इतर खेळाडूंनी फिक्सिंगचे आरोप केले, यामध्ये लू विन्सेंट याचा समावेश होता. लू विन्सेंट स्वत: मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. केर्न्सने आपल्याला फिक्सिंगची ऑफर दिली होती, असा आरोप विन्सेंटने केला होता, पण हे आरोप कधीही सिद्ध होऊ शकले नाहीत.
मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर केर्न्सची आर्थिक स्थिती खराब झाली. घर चालवण्यासाठी त्याला ऑकलंड नगरपालिकेचे ट्रक चालवावे लागले, तसंच बस धुणे आणि बारमध्येही काम करावं लागलं.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#सटर #करकटपट #लढतय #आयषयच #लढई #रगणलयत #लईफ #सपरट #ससटमवर