26 वर्षांचा इमाम जियो न्यूजचा कार्यक्रम ‘हसना मना है’ या कार्यक्रमात आला होता, त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मुलीने त्याला लग्नासाठी विचारणा केली. यानंतर हसत इमाम मी काय म्हणू शकतो? असा प्रश्न विचारला. तेव्हा प्लीज नाही म्हणू नकोस, अशी विनंती मुलीने इमामला केली. यासाठी तुला माझ्या आईकडे जावं लागेल, तीच याचं उत्तर देऊ शकते, असं इमाम म्हणाला. यानंतर मुलीने तू हो तर म्हण, मी कोणाशीही बोलायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
Girl proposes @ImamUlHaq12 in comedy show ‘Hasna Mana Hai’
VC: @geonews_urdu#Cricket #ImamulHaq #CricketTwitter pic.twitter.com/JN7bMnGAME
— Cricket Room (@cricketroom_) May 12, 2022
याआधी इमाम उल हकने पुढचं एक-दीड वर्ष आपल्याला लग्न करण्याची इच्छा नाही, सध्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. बाबर आझमने लग्न केल्यानंतर मी लग्नाबाबत विचार करेन असं सांगितलं होतं. इमाम पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकचा भाचा आहे. 2017 साली त्याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
इमाम उल हक याचे महिलांसोबतचे अश्लिल व्हॉट्सऍप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, यानंतर त्याला माफीही मागावी लागली होती. इमामने 14 टेस्ट, 49 वनडे आणि 2 टी-20 मॅच खेळल्या आहेत. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 855 रन आणि दोन शतकं तसंच 4 अर्धशतकं आहेत. वनडेमध्ये त्याने 9 शतकं आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 2,321 रन केले आहेत. 151 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#सकणडलमधय #अडकललय #पकसतन #खळडल #Live #Show #मधय #मलन #कल #परपज