सफरचंदाच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. यासोबतच सफरचंदाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ईचा वापर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्कीन केअरमध्ये सफरचंदाची साल वापरण्याच्या पद्धती आणि त्वचेवर सफरचंदच्या सालीचे काही आश्चर्यकारक फायदे सांगणार आहोत.
त्वचेला moisturize करते –
उन्हाळ्यात त्वचेतील ओलावा कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज वाटू लागते. अशा परिस्थितीत त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी सफरचंदाच्या सालीचाही वापर करू शकता. यासाठी सफरचंदाची साल आणि टोमॅटो बारीक करून पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये थोडे दही घालून चेहऱ्याला लावा. कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्याचा ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
हे वाचा – कुत्रा अचानक अंगावर आल्यावर असं चुकून पण करायचं नसतं; नाहीतर नक्की चावेल
त्वचा उजळण्यासाठी –
उन्हाळ्यात तुम्ही सफरचंदाच्या सालीला तुमच्या त्वचेचे ग्लोइंग सिक्रेट बनवू शकता. यासाठी सफरचंदाची साले वाळवून बारीक करून घ्या. आता सफरचंदाच्या सालीपासून बनवलेल्या पावडरमध्ये ताजे लोणी मिसळा आणि चेहऱ्यावर आणि मानेला चांगले लावा. नंतर कोरडे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून तीनदा वापरल्याने तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या उजळेल.
हे वाचा – Shocking! जोशाजोशात गेला जीव; बाथरूममध्ये शारीरिक संबंधादरम्यान महिलेचा मृत्यू
सफरचंदाच्या सालीचे त्वचेसाठी फायदे –
सफरचंद शरीरातील अनेक रोगांशी लढण्यास मदत करते. त्याचप्रमाणे सफरचंदाची सालेही त्वचेवर खूप गुणकारी असतात. सफरचंदाच्या सालीपासून बनवलेला फेस पॅक वापरून उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या घालवता येतात. सफरचंदाची साल त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, टॅनिंग आणि पुरळ कमी होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#सकन #कअर #परडकट #नकच #सदर #चहरयसठ #सफरचदचय #सलच #अस #कर #उपयग