Saturday, July 2, 2022
Home करमणूक सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर नीतू कपूर यांचे वक्तव्य, म्हणाल्या "कोणीही कोणालाही..." |...

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर नीतू कपूर यांचे वक्तव्य, म्हणाल्या “कोणीही कोणालाही…” | Neetu Kapoor reacts to trolls who criticizing her For Romantically Dancing With Marzi After Rishi Kapoor Demise nrp 97बॉलिवूडच्या अभिनेत्री नीतू कपूर या नेहमीच विविध कारणामुळे चर्चेत असतात. नीतू कपूर यांनी बालकलाकार म्हणून हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर अनेकांची मनं जिकंली. नीतू कपूर या सध्या सिनेसृष्टीत सक्रीय नसल्या तरी त्या सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव्ह असतात. त्या नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या या व्हिडीओला अनेकजण लाइक्स आणि कमेंट करताना दिसतात. अनेकदा त्यांना त्यांच्या पोस्टवरुन ट्रोलही केले जाते. नुकतंच त्यांनी या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे.

नीतू कपूर या लवकरच ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात झळकणार आहेत. सध्या त्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यावेळी एका मुलाखतीत त्यांनी ट्रोलिंगवर भाष्य केले. “मी ट्रोलर्सची अजिबात पर्वा करत नाही. कारण ते निनावी लोक असतात. त्यांचे नाव, पत्ता, ओळख याची मला काहीही माहिती नाही. सोशल मीडियावर अकाऊंट बनवून कोणीही कोणालाही ट्रोल करु शकतो.” असेही नीतू कपूर यांनी सांगितले.

“कदाचित माझा ड्रायव्हर किंवा कुक हे देखील मला सोशल मीडियावर शिवीगाळ करत असतील. त्यामुळे मी सोशल मीडिया ट्रोलर्सला कधीच गांभीर्याने घेत नाही. कारण ते कोणताही चेहरा नसलेले अनोळखी लोक आहेत”, असे नीतू कपूर म्हणाल्या.

“आधी अनेक लोक मला ओळखत होते. पण आता हल्लीच्या पिढीतील लोक मला ओळखायला लागले आहेत. ते मला फॉलो करतात याचा मला आनंद आहे. सध्या माझ्या घरी कोणीही नसते. ऋषी कपूर यांच्या जाण्यामुळे घरात प्रचंड शांतता पसरली आहे. मला लोकांशी बोलणं फार आवडते. त्यामुळे आता मला जेव्हा पापराझी भेटतात तेव्हा मी त्यांच्याशी नेहमी गप्पा मारते. त्याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात”, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट येत्या २४ जून २०२२ रोजी प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. यात वरुण धवन आणि कियारा आडवाणी यांच्या व्यतिरिक्त अनिल कपूर, नीतू कपूर, प्राजक्ता कोळी, मनीष पॉल, टिस्का चोप्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#सशल #मडयवर #हणऱय #टरलगवर #नत #कपर #यच #वकतवय #महणलय #कणह #कणलह #Neetu #Kapoor #reacts #trolls #criticizing #Romantically #Dancing #Marzi #Rishi #Kapoor #Demise #nrp

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

ठाकरे सरकारने उचलबांगडी केलेल्या अश्विनी भिडे पुन्हा मोठ्या जबाबदारीवर परतणार?

मुंबई, 1 जुलै : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळताच सत्तेत आलेल्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेला (Shiv Sena) झटका देण्यासाठी रणनीती...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 1 जुलै 2022 : शुक्रवार : ABP Majha

<p>Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 1 जुलै 2022 : शुक्रवार : ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Ind vs Eng 5th Test Playing 11 Pitch Report and Updates in Marathi vkk 95

India vs England 5th Test Playing 11 : आजपासून (१ जुलै) एजबस्टन येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना खेळला जाणार आहे....

कन्हैया लालच्या हत्येत वापरली 2611 क्रमांची दुचाकी, खास नंबरसाठी मारेकऱ्याने मोजले होते पैसे

  Udaipur Murder Case : राजस्थानमधील उदयपूर येथील टेलर कन्हैया लाल याच्या हत्येप्रकरणी आता रोज नव-नवीन खुलासे होत आहेत....

बॉस ऑफर ! Samsung च्या या स्मार्ट टीव्हीवर सगळ्यात मोठा डिस्काउंट, ३ हजारात घरी येईल टीव्ही

नवी दिल्ली:Flipkart Big Bachat Dhamaal Sale: फ्लिपकार्टवर बिग बचत धमाल सेल आज म्हणजे १ जुलैपासून सुरू झाला असून ३ जुलैपर्यंत चालणार आहे ....

शिंदेंच्या बंडखोर गटानं मुक्काम केलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं बिल किती? समोर आला आकडा

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा मुक्काम गुवाहाटीतील रॅडिसन ब्ल्यूमध्ये होता. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार ८ दिवस गुवाहाटीत होते. या हॉटेलचं बिल...