पोटाच्या वाढलेल्या घेरामुळे तुम्ही वास्तवापेक्षा अजूनच जाड दिसू शकता. या गोष्टीमुळे तुमचा आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो. या फॅशन टिप वापरुन तुम्ही तुमचे बेली फॅट्स लपवू स्लिम दिसू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
(फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया )
वाइड बेल्टने लपवा बेली

जर तुमच्याकडे थोडा लांब टॉप असेल तर तुम्ही तुमच्या कंबरेला रुंद बेल्ट बांधू शकता. हे तुमच्या कमरेला आकारामध्ये आणण्यासाठी मदत करेल. त्यामुळे ड्रेसवर किंवा टी- शर्टवर तुम्ही वाइड बेल्ट वापरु शकता. हा लूक तुम्हाला स्टाईलिश सुद्धा बनवेल.
(वाचा :-उन्हाळ्यात घ्या महागड्या साड्यांची खास काळजी, वाढवा त्यांचे आयुष्य !)
टी- शर्टवर परिधान करा शर्ट

जर तुम्हाला स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही टी- शर्टवर शर्ट परिधान करु शकता.हे तुम्हाला स्लिम दिसण्यात मदत करेल. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या शर्टचे कॉलर बटण म्हणजेच वरची दोन बटणे उघडी ठेवून शकता. यामुळे तुमची कंबर मोठी होण्याऐवजी लहान दिसेल.
(वाचा :- Summer Sharara Fashion : या उन्हाळ्यात हिना खानचा शरारा सेट ठरतोय प्रचंड ट्रेंडी, प्रत्येक फंक्शनसाठी परफेक्ट..!)
योग्य प्रिंटचे कपडे निवडा

योग्य प्रिंटचे कपडे निवडे देखील तेवढंच महत्त्वाचे असते. प्रिंट्स तुमचा लुक सुधारण्यात खूप मदत करतात. यामुळे तुमच्या शरीराच्या आकारात बदल होतो. जर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्ही सडपातळ दिसू शकता.
(वाचा :- अभिनेत्रींपाठोपाठच अभिनेत्यांचा देखील स्विमवेअरमधील हॉट अवतार, यामध्ये मिलिंद सोमण ते कार्तिक आर्यनपर्यंत साऱ्यांचा समावेश)
टॉप टक करू नका

टी-शर्ट किंवा टॉप तुमच्या पॅन्ट किंवा जीन्समध्ये टक करु नका यामुळे तुमचे पोट स्पष्टपणे लोकांना दिसू शकते. जर तुम्ही टक केले तर तुमच्या पोटावरील पॅट्स तर दिसतीलच पण तुम्ही उंचीने लहान दिसू शकता.
(वाचा :- office wear idea : ऑफिसमध्ये कोणते कपडे घालावेत हा रोजचा प्रश्न आहे? चिंता सोडा, ऑफिससाठी लक्षवेधी लूक)
हाय वेस्ट जीन्स

जर तुम्हाला कुल लूक हवा असेल आणि पोटावरील चरबी देखील लपवायची असेल तर तुम्ही हाय वेस्ट जीन्स वापरु शकता. हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय राहील. या जीन्सवर तुम्ही एखादा रफल टॉपच्या मदतीने पोटावरील चरबी लपवू शकता.
(वाचा :- या ५ गोष्टींवर मुली बेफान होऊन खर्च करतात, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी)
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#सपय #पदधतन #लपव #तमच #बल #फटस #ह #सटयलश #टपस #नकक #टरय #कर