हायलाइट्स:
- सोनालीच्या नव्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
- ‘तमाशा लाइव्ह’ मध्ये असणार तब्बल तीस गाणी
- मराठी चित्रपटसृष्टीमध्ये होतोय नवा प्रयोग
घर गेलं म्हणून रुपाली भोसलेवर आलेली गोठ्यात राहायची वेळ
‘तमाशा लाइव्ह’ बद्दल अधिक माहिती देताना संजय जाधव म्हणाले, ‘मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. या चित्रपटात एक दोन नाही तर तब्बल तीस गाणी असणार आहेत. त्यासाठी सोनाली आम्हाला योग्य वाटली. क्षितिज पटवर्धन याने गाण्यांचे बोल लिहिले असून अमितराजने ती संगीतबद्ध केली आहेत. तर नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव याच आहे. एकंदरीतच ही संपूर्ण टीम एकदम भन्नाट आहे. सोनाली माझी खूप चांगली मैत्रीण आहे पण आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे.’
या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून पटकथा संजय जाधव यांची आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग ‘तमाशा लाइव्ह’ चे निर्माता आहेत. संजय सध्या ‘अनुराधा’ चित्रपट करत आहेत तर सोनाली ‘हाकमारी’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरनुसार हा चित्रपट नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘तमाशा लाइव्ह’ संगीतमय चित्रपट असल्याने प्रेक्षकांचा त्याला कसा प्रतिसाद लाभतो हे पाहणं औसुक्याचं ठरेल. परंतु, पोस्टर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
रात्रीस खेळ चाले ३- नाईकांच्या वाड्यात घुमणार अण्णांचा आवाज
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#सनल #कलकरणच #लइवह #तमश #मरठ #चतरपटत #हणर #अनख #परयग