Saturday, August 13, 2022
Home करमणूक 'सॉरी अम्मा अब्बा, मी नाक कापलं' सारा अली खानने का मागितली आई-...

‘सॉरी अम्मा अब्बा, मी नाक कापलं’ सारा अली खानने का मागितली आई- बाबांची माफी?


मुंबई- नवाब कुटुंबाची मुलगी सारा अली खान ने अगदी कमी कालावधीत आपली वेगळी ओळख सिनेसृष्टीत निर्माण केली आहे. साराने २०१८ मध्ये ‘केदारनाथ’ सिनेमातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला नसला तरी सारा लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली. सिनेमांप्रमाणेच सारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. आपल्या नवनवीन पोस्टमधून ती चाहत्यांना कामासंबंधी आणि वैयक्तिक आयुष्यासंबंधी गोष्टींचे अपडेट देत असते.

अलीकडेच साराने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओसोबतच साराने तिच्या आई- वडिलांची म्हणजेच सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचीही माफी मागितली आहे. एवढेच नाही तर मी माझे नाक कापले असेही सारा यावेळी म्हणाली. हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे हे जाणून घेऊया. साराने असं काय केलं की तिला आपल्या आई- वडिलांची माफी मागावी लागली तेही जाणून घेऊ.

व्हिडिओ शेअर करताना साराच्या नाकाला दुखापत झाल्याचं दिसून येतं. यावेळी साराने लिहिले की, ‘सॉरी अम्मा, अब्बा आणि इग्गी. मी माझे नाक कापले.’ साराचा हा व्हिडिओ आणि त्यासोबत लिहिलेले विचित्र कॅप्शन पाहून चाहते आश्चर्यचकित झालेत. नाक कापण्याचा अर्थ तिच्या नाकाला झालेली दुखापत सांगणं होतं. तिने हे फक्त थोड्या मजेशीर अंदाजात सांगितलं.


साराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने सुरुवातीला आपलं नाक कापसाने झाकलेलं दिसत आहे. काही सेकंदांनंतर जेव्हा ती तिच्या नाकावर ठेवलेला कापूस काढते तेव्हा तिच्या नाकाला झालेली दुखापत दिसून येते. तिच्या नाकातून रक्त वाहतानाही दिसतं. साराचा हा व्हिडिओ मजेशीर तर आहेच पण तो पाहून चाहत्यांनी तिच्याबद्दल चिंताही व्यक्त केली आहे.

सारा अली खान केवळ सोशल मीडियावर सक्रिय नाही तर सोशल मीडियावर लाखोंमध्ये तिच्या चाहत्यांची एक मोठी यादी आहे. तिने इन्स्टाग्रामवर कोणतीही पोस्ट टाकली की ती लगेच व्हायरल होते. सारा अली खान चे इन्स्टाग्रामवर ३३ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ते दिवसेंदिवस वाढत आहेत.


२०१८ मध्ये साराने ‘केदारनाथ’ सिनेमातून पदार्पण केले. या सिनेमात ती सुशांतसिंह राजपूतसोबत दिसली होती. याशिवाय साराने इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल’ या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत काम केले होते. साराच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘अतरंगी रे’ सिनेमात दिसणार आहे. यात ती अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुषसोबत काम करत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#सर #अमम #अबब #म #नक #कपल #सर #अल #खनन #क #मगतल #आई #बबच #मफ

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

Salman Rushdie attack : सलमान रश्दींवर अमेरिकेत जीवघेणा हल्ला, गळ्याजवळ चाकूनं सपासप वार

न्यूयॉर्क : भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमधील बफेलोमध्ये चौटाउक्वामध्ये एका व्याख्यानावेळी चाकूनं जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सलमान रश्दी यांची ओळख करुन...

Bad Taste : तुमच्या तोंडाची चव बिघडलीय? मग हे उपाय करुन पाहा; कडवटपणा लगेच दुर होईल

बऱ्याचदा लोकांसोबत असं घडतं की, त्यांच्या तोंडाची चव अचानक निघून जाते. म्हणजेच काय तर त्यांचं तोंड कडू होतं आणि त्यांना काहीही खाण्याची इच्छा...

भारतीय संघात एकामागून एक मोठे धक्के, कर्णधारानंतर आता प्रशिक्षकही बदलण्याचा निर्णय

नवी दिल्ली : भारतीय संघात नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. कारण गुरुवारी भारतीय संघाचा कर्णधार बदलण्यात आला होता....

असा साजरा केला सनी लिओनीने रक्षाबंधनाचा सण, जाणून घ्या कोण आहे या अभिनेत्रीचा भाऊ!

असा साजरा केला सनी लिओनीने रक्षाबंधनाचा सण, जाणून घ्या कोण आहे या अभिनेत्रीचा भाऊ! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...