Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट सॅमसंगचा ‘हा’ दमदार स्मार्टफोन झाला तब्बल ४ हजारांनी स्वस्त, मिळते ७०००mAh बॅटरी

सॅमसंगचा ‘हा’ दमदार स्मार्टफोन झाला तब्बल ४ हजारांनी स्वस्त, मिळते ७०००mAh बॅटरी


हायलाइट्स:

  • Samsung Galaxy F62 च्या किंमतीत कपात.
  • फोनची किंमत तब्बल चार हजारांनी झाली कमी.
  • फोनमध्ये मिळेल क्वाड रियर कॅमेरा सेटअप.

नवी दिल्ली : सॅमसंगने फेब्रुवारी महिन्यात लाँच केलेल्या Samsung Galaxy F62 या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. कंपनीने फोनची किंमत तब्बल ४ हजार रुपयांनी कमी केली आहे. Samsung Galaxy M51 नंतर हा ७००० एमएएच बॅटरीसह २० हजार रुपयांच्या आत येणारा एकमेव स्मार्टफोन आहे.

वाचाः सॅमसंगच्या ‘या’ फोल्डेबल स्मार्टफोन्सची किंमत लीक, ११ ऑगस्टला होणार लाँच

Samsung Galaxy F62: नवीन किंमत

Samsung Galaxy F62 स्मार्टफोन ६ जीबी आणि ८ जीबी रॅम या व्हेरिएंटमध्ये येतो. कंपनीने फोनच्या ६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत कमी केली आहे. ४ हजार रुपये कपातीनंतर हा फोन १९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. आता हा फोन Mi 10i (रुपये २०,९९९) आणि Realme 7 Pro (रुपये १९,९९९) ला टक्कर देईल.

Samsung Galaxy F62: स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी एफ ६२ या स्मार्टफोनमध्ये Exynos ९ सीरिज ९८२५ प्रोसेसरसह ६जीबी/८जीबी रॅम देण्यात आले आहे. फोनमध्ये १२८ जीबी स्टोरेज मिळते, जे मायक्रोएसडी कार्ड वापरून वाढवू शकता.

फोनमध्ये फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून, याचे पिक्सल रिझॉल्यूशन १०८०x२४०० आहे. फोन अँड्राइड ११ वर आधारित One UI ३.१ वर काम करतो. यात ड्यूल सिम सपोर्ट मिळले. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि पॉवरसाठी २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ७००० एमएएचची बॅटरी मिळते.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये रियरला ६४ मेगापिक्सलचा मुख्य सेंसर, १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, ५ मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि ५ मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर मिळेल. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

वाचाः जिओची खास सुविधा, आता थेट टीव्हीवरून करा व्हिडीओ कॉल; पाहा डिटेल्स

वाचाः YouTube Shorts मधून होणार भरघोस कमाई, क्रिएटर्सला मिळणार ‘एवढे’ पैसे कमवण्याची संधी

वाचाः ‘या’ कंपनीच्या प्लानसमोर जिओ देखील फेल, १२० दिवस वैधतेसह मिळेल दररोज २ जीबी डेटा

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा

आणखी व्हेरिएंट्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#समसगच #ह #दमदर #समरटफन #झल #तबबल #४ #हजरन #सवसत #मळत #७०००mAh #बटर

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

सज्ज व्हा! लिजेंड्स पुन्हा मैदानात, पुन्हा चौकार षटकारांची आतिषबाजी

LCL 2022: लीजेंड्स क्रिकेट लीगचा (legends cricekt league 2022) दुसरा हंगाम यंदा भारतात खेळवला जाणार आहे. 16 सप्टेंबरला एका विशेष सामन्याने स्पर्धेची शानदार...

Mumbai: ‘खूप आमिषे दाखवली जातील पण कुणाचं ऐकू नका’ उद्धव ठाकरेंचा मुंबईतील माजी नगरसेवकांना कानमंत्र

<p><strong>Mumbai:</strong> मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसलीय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मुंबईतील माजी नगरसेवकांशी संवाद साधला. येत्या काळात...

७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिओची पैसा वसूल ऑफर, फ्रीमध्ये रिचार्ज करा हा वार्षिक प्लान

नवी दिल्लीःReliance Jio Independence Day : स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीमेची घोषणा केली आहे....

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

सावधान! तो पुन्हा येतोय… या 7 राज्यात CORONA चा वेग पुन्हा वाढला

Corona Update : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय असं वाटत असतानाच देशात आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे...

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....