Monday, July 4, 2022
Home टेक-गॅजेट सॅमसंगचा सर्वात मोठा इव्हेंट, दमदार फोल्डेबल स्मार्टफोनसह स्मार्टवॉच, इयरबड्स करणार लाँच

सॅमसंगचा सर्वात मोठा इव्हेंट, दमदार फोल्डेबल स्मार्टफोनसह स्मार्टवॉच, इयरबड्स करणार लाँच


टेक कंपनी सॅमसंगचा या वर्षीचा सर्वात मोठा इव्हेंट उद्या (११ ऑगस्ट) होणार आहे. या इव्हेंटला कंपनीने Galaxy Unpacked 2021 नाव दिले असून, हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार उद्या सायंकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. गेल्या अनेक दिवसांपासून या इव्हेंटची आणि या इव्हेंटमध्ये लाँच होणाऱ्या सॅमसंगच्या प्रोडक्ट्सची चर्चा आहे. या इव्हेंटमध्ये सॅमसंग आपले नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्स सादर करणार आहे. एवढेच नाही तर या फोल्डेबल स्मार्टफोन्ससोबत Google आणि Samsung ने मिळून तयार केलेल्या WearOS ला देखील सादर करणार आहे. याशिवाय कंपनी Galaxy Buds TWS इयरफोन्स लाँच करणार आहे. सॅमसंग या इव्हेंटमध्ये काही अनपेक्षित लाँच करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देखील देण्याची शक्यता आहे. Galaxy Unpacked 2021 इव्हेंटमध्ये लाँच होण्याची शक्यता असलेल्या अशाच काही स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच व इतर डिव्हाइसबद्दल जाणून घेऊया.

Galaxy Z Fold 3

galaxy-z-fold-3

या इव्हेंटमध्ये सर्वांचे लक्ष Samsung Galaxy Z Fold 3 या फोल्डेबल स्मार्टफोनच्या लाँचिंगकडे असेल. या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ७.६ इंचाचा मोठा मुख्य डिस्प्ले मिळेल व यात इन-डिस्प्ले फ्रंट कॅमेरा देण्याची शक्यता आहे. तर रियरला तीन १२ मेगापिक्सलचे सेंसर्स मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ८८८+ चिपसेट मिळू शकतो. तसेच पॉवरसाठी ४,३८० एमएएचची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये एस-पेनसाठी देखील जागा मिळेल.

Galaxy Z Flip 3

galaxy-z-flip-3

Galaxy Z Fold 3 या स्मार्टफोनसोबतच आणखी एका फोल्डेबल स्मार्टफोनची चर्चा आहे ती म्हणजे Samsung Galaxy Z Flip 3. हा कंपनीच्या २०२१ पोर्टफोलियोमधील सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन असू शकतो. गॅलेक्सी झेड फ्लिप ३ स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच डायनॅमिक एमोलेड फोल्डेबल प्राइमरी डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज असेल. याचा स्क्रीन कव्हर मोठा असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये पॉवरसाठी ३३०० एमएएचची बॅटरी मिळू शकते.

Galaxy Watch 4

galaxy-watch-4

Samsung Galaxy Watch 4 वॉच आकर्षक डिझाइनसह येण्याची शक्यता आहे. याचा आकार ४०एमएम किंवा ४४एमएम असण्याची शक्यता आहे. यामध्ये ग्रीन आणि रोज गोल्ड कलर मिळू शकतो. ही स्मार्टवॉच Wear OS 3 वर काम करेल. ही ऑपरेटिंग सिस्टम सॅमसंग आणि गुगलने मिळून तयार केली आहे. वॉचमध्ये Gorilla Glass DX layer मिळण्याची शक्यता आहे. तसेच धुळ व पाण्यापासून देखील ही वॉच सुरक्षित राहिल. वॉच आयपी६८ रेटिंगसह येईल.

Watch 4 Classic

watch-4-classic

Watch 4 Classic या वॉचची आयपी रेटिंग आणि डिस्प्ले गॅलेक्सी वॉच ४ प्रमाणेच असण्याची शक्यता आहे. मात्र, या वॉचचा शेप नियमितपणे येणाऱ्या वॉच सारखा आणि यात रोटेटिंग बेझेल मिळतील.

Galaxy Buds 2

सॅमसंग आपल्या TWS लाइनअपचा विस्तार करत Samsung Galaxy Buds 2 या इयरबड्सला लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर मिळेल. यात वेगवेगळे कलर ऑप्शन्स देखील मिळतील.

Samsung Galaxy S21 FE

samsung-galaxy-s21-fe

या इव्हेंटमध्ये Samsung Galaxy S21 FE देखील लाँच होण्याची शक्यता आहे. हे Galaxy S21 चे फॅन एडिशन असेल. तसेच, काही रिपोर्टनुसार, हे डिव्हाइस ऑक्टोबरमध्ये लाँच होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. फोनमध्ये ६.४ इंच सुपर एमोलेड FHD+ डिस्प्ले मिळू शकतो. तसेच या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर, ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि रियरला १२+१२+८ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहाअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#समसगच #सरवत #मठ #इवहट #दमदर #फलडबल #समरटफनसह #समरटवच #इयरबडस #करणर #लच

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...