Friday, August 12, 2022
Home टेक-गॅजेट सुरक्षिततेच्या दृष्टिने UPI PIN बदलत राहणे आवश्यक, पिन बदलण्यासाठी फॉलो करा 'ही'...

सुरक्षिततेच्या दृष्टिने UPI PIN बदलत राहणे आवश्यक, पिन बदलण्यासाठी फॉलो करा ‘ही’ प्रोसेसUPI Payments: आजपासून काही वर्षांपूर्वी जर दुसऱ्या शहरात असलेल्या तुमच्या एखाद्या नातेवाईकाला पैसे पाठवायचे असल्यास तुम्हाला मोठी प्रक्रिया करावी लागायची. त्यावेळी पैशांचा व्यवहार हा खरोखरच त्रासदायक होता. परंतु, नंतर ऑनलाइन पेमेंटचे युग सुरू झाल्यापासून मनी ट्रान्सफर, बिल पेमेंट, रिचार्ज यासारख्या गोष्टी अगदी सोप्या झाल्या आहेत. त्यासाठी UPI चे आभारच मानायला हवे. आता तेच रस्त्याच्या कोपऱ्यातील दुकानातून फक्त फोनद्वारेच खरेदी करता येईल. ना खुल्या पैशाचे टेन्शन ना नाणी आणि नोटा मोजण्याचा त्रास. कुणाकडून पैसे द्यायचे की घ्यायचे, सर्व काही मोबाइलच्या माध्यमातून होते. पण तुम्हाला माहीत आहे का की आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने तुम्ही तुमचा UPI पिन वेळोवेळी बदलत राहायला हवा? सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे आहे. UPI पिन कसा बदलायचा ? जाणून घ्या सविस्तर. पाहा टिप्स.

UPI

upi

UPI म्हणजे काय: UPI म्हणजे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस. ही एक झटपट रीअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे. जी खासकरून NPCI द्वारे विकसित केलेली आहे, म्हणजे आंतर-बँक व्यवहारांसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. UPI ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI द्वारे नियंत्रित केली जाते आणि या कारणास्तव ते पूर्णपणे सुरक्षित आणि विश्वासार्ह मानली जाते. कोणत्याही प्लॅटफॉर्म UPI आयडीवरून केलेल्या व्यवहारांचे संपूर्ण खाते NPCI कडेच राहते. Paytm आणि Google Pay हे देशातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या मोबाईल पेमेंट आणि आर्थिक सेवा Apps आहे.

वाचा:बॉस ऑफर ! Samsung च्या ‘या’ Smart TV वर सगळ्यात मोठा डिस्काउंट, ३ हजारात टीव्ही येईल घरी

Easy Process

easy-process

तुम्हाला ज्या बँक खात्याचा UPI आयडी पिन बदलायचा आहे ते येथे निवडा. खाते तपशील निवडल्यानंतर, तुम्हाला ‘नवीन UPI पिन तयार करा’ पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. हा पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला बँक खात्याचे तपशील सबमिट करावे लागतील, ज्यामध्ये डेबिट कार्डचे शेवटचे 6 अंक आणि कार्डची एक्सपायरी तारीख लिहावी लागेल. तपशील प्रविष्ट केल्यानंतर ‘प्रोसीड’ बटणावर क्लिक करा. प्रक्रिया केल्यानंतर, नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, जो सबमिट करावा लागेल. आणि त्यानंतर एटीएम पिन टाकावा लागेल. ATM पिन टाकल्यानंतर तुम्हाला Set Your Pin चा पर्याय मिळेल, त्यानंतर तुम्ही UPI पिन टाकू शकता.

वाचा : Best Deals: स्वस्तात मिळतोय ६००० mAh बॅटरीचा हा सॅमसंग फोन, ६४ GB ७४९ तर, १२८ GB व्हेरियंट ९९९ रुपयांत करा खरेदी

Paytm

paytm

सर्वप्रथम तुमचे खाते ज्या फोनमध्ये लॉग-इन आहे त्या फोनमध्ये पेटीएम अॅप उघडा. अॅपमध्ये असलेल्या ‘प्रोफाइल’ आयकॉनवर जा आणि ते उघडा, ते अॅपच्या वरच्या डाव्या बाजूला असेल. प्रोफाइल विभागात उपस्थित असलेल्या ‘सेटिंग्ज’ पर्यायावर जा आणि त्यावर क्लिक करा सेटिंग्ज विभागात ‘पेमेंट सेटिंग्ज’ टॅब दिलेला आहे जेथे ‘सेव्ह कार्ड्स आणि बँक अकाउंट्स’ पर्याय आहे, त्यावर क्लिक करा. सेव्ह कार्ड्स आणि बँक खात्यांना तुम्ही पेटीएमवर टाकलेल्या सर्व बँक खात्यांची आणि तुम्ही लिंक केलेल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डांची यादी मिळेल.

वाचा : OnePlus Nord 2T 5G की Poco F4 5G ? कोणता स्मार्टफोन खरेदी करणे आहे तुमच्या फायद्याचे?

Google Pay

google-pay

सर्वप्रथम Google Pay अॅपमध्ये, वरच्या डाव्या बाजूला असलेल्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा. पेमेंट मेथडवर क्लिक करा. जर एकापेक्षा जास्त बँक खाती जोडली असतील, तर ज्या बँकेच्या प्लॅटफॉर्मवर तुमचा UPI आयडी आहे त्यावर क्लिक करा. तीन डॉट्सवर क्लिक करा. ज्यामध्ये UPI पिन बदला हा पर्याय दिसेल. क्लिक करा. तुम्हाला चेंज UPI पिन मध्ये दोन रिकाम्या जागा भरायच्या आहेत. सध्याचा UPI पिन पहिल्यामध्ये टाकावा लागेल आणि नवीन पिन दुसऱ्यामध्ये टाकावा लागेल. विद्यमान UPI पिन आणि नवीन UPI पिन टाकल्यानंतर, तुम्हाला पुन्हा नवीन UPI पिन टाकण्यास सांगितले जाईल, पुन्हा नवीन पिन टाका नवीन UPI पिन सत्यापित झाल्यानंतर, खाली दिलेल्या ओकेवर क्लिक करा.

वाचा : Micro SD Card Tips: या सोप्पी टिप्स वापरून स्वतःच रिपेयर करा खराब मायक्रोएसडी कार्ड

UPI Benefits

upi-benefits

UPI च्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, व्यवहार अर्थातच १ लाख, असेल किंवा फक्त १ रुपया, UPI वर सर्व प्रकारचे व्यवहार आणि पेमेंट पटकन केले जातात. UPI खाते थेट युजर्सच्या बँक खात्याशी जोडलेले असते आणि त्याद्वारे पेमेंट करताना OTP ची आवश्यकता नसते. UPI पिन टाकूनच व्यवहार पूर्ण होतो. या पेमेंट इंटरफेसचा मोठा फायदा म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेचे किंवा अॅपचे UPI खाते वापरत असलात तरीही, UPI व्यवहारा दरम्यान, सर्व QR कोड एकाच प्लॅटफॉर्मवर व्यवहार पूर्ण करतात.

वाचा :Croma वर सुरू झाला भन्नाट सेल, iPhone ते AC सह अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करता येणार , पाहा ऑफर्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सरकषततचय #दषटन #UPI #PIN #बदलत #रहण #आवशयक #पन #बदलणयसठ #फल #कर #ह #परसस

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

Most Popular

तुम्ही धोका दिलात; BCCI च्या निर्णयावर चाहते भडकले, जाणून घ्या झालं

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. ३ सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच झिम्बाब्वेला रवाना होणार...

Health Tips: डोळे अधिक सक्षम आणि दृष्टी वाढवण्यासाठी आहारात या 3 गोष्टींचा समावेश करा, चष्म्याचे नो टेन्शन !

Health Tips: डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग आहे. आपण फक्त आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. पण आजच्या काम करण्याचा सवईमुळे आणि...

‘रुपी’वरील हातोडा टाळता आला असता?

१९१२ मध्ये स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील या जुन्या बँकेला सहकार क्षेत्रातील अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांची बळी ठरल्याने ही घरघर लागली आहे. सचिन रोहेकर मराठी माणसांनी सुरू...

घरच्या घरीच करा हा सोपा उपाय आणि अपचनाला करा बायबाय!

मुंबई, 12 ऑगस्ट : मसाल्यातील प्रमुख घटक असलेला हिंग आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे जेवणाची चव वाढवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगाचे अनेक...

श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे...

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...