Saturday, July 2, 2022
Home भारत सुप्रीम कोर्टाचा भाजप, काँग्रेससह आठ राजकीय पक्षांना दंड

सुप्रीम कोर्टाचा भाजप, काँग्रेससह आठ राजकीय पक्षांना दंड


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायलयाने आठ राजकीय पक्षांना दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप आणि काँग्रेससह आठ राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांविरोधातील गुन्हेगारी खटल्यांचा तपशील जाहीर न केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. बिहार निवडणुकीदरम्यान उमेदवारांचे गुन्हेगारी तपशील माध्यमांमध्ये प्रकाशित न करण्याच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने 8 पक्षांना त्याच्या आदेशाचे पालन न केल्याने अवमान केल्याबद्दल दोषी ठरवले आहे.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जेडीयू, आरजेडी, एलजेपी, काँग्रेस, भाजप, सीपीआय यांना प्रत्येकी 1 लाखांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय सीपीएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या कारवाईनंतर भविष्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत की, राजकीय पक्षांनी उमेदवारांचे गुन्हेगारी तपशील त्यांच्या वेबसाईटवर टाकावेत. निवडणूक आयोगाने एक अॅप बनवावे, जिथे मतदारांना अशी माहिती दिसेल. यासह, पक्षाने उमेदवार निवडल्यानंतर 48 तासांच्या आत मीडियामध्ये गुन्हेगारी तपशील प्रकाशित करावे. आदेशाचे पालन न झाल्यास आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला कळवावे.

आमदार-खासदारांच्या विरोधातील खटल्यांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या बदल्या करु नये : सर्वोच्च न्यायालय

राज्य सरकारे खासदार/आमदारांवरील खटले सहज मागे घेऊ शकणार नाही

राज्य सरकार यापुढे मनमानी पद्धतीने लोकप्रतिनिधींवरील प्रलंबित गुन्हेगारी खटले मागे घेऊ शकणार नाही. उच्च न्यायालयाच्या मान्यतेशिवाय कोणतेही राज्य सरकार वर्तमान किंवा माजी लोकप्रतिनिधींविरोधातील गुन्हेगारी खटले मागे घेऊ शकत नाही, असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. खासदार/आमदारांविरोधातील प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा करण्याशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

Pegasus Spyware : पेगॅसिस प्रकरणी सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना मागितला पुरावा, 10 ऑगस्टला पुढील सुनावणी 

2016 पासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्व प्रलंबित प्रकरणांचा तपशील मागितला होता. तसेच प्रत्येक राज्यात विशेष खासदार/आमदार न्यायालये स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारला निधी जारी करण्यास सांगितले. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली होती. तेव्हापासून केंद्राने न्यायालयाच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दाखल केलेले नाही. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने सरकारच्या गांभीर्यावर प्रश्न उपस्थित केले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सपरम #करटच #भजप #कगरससह #आठ #रजकय #पकषन #दड

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

Amartya Sen on Nation Crisis: देशातील तणावपूर्वक घटनांवर नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले…

कोलकाताः मला कोणत्या गोष्टीची भिती वाटते का?, असं जर कोणी मला विचारलं तर मी त्याला होय असंच उत्तर दिलं. माझ्या भीतीचं कारण ही...

व्हिडीओ जॉकी म्हणून केली करियरची सुरुवात, अजूनही सुपरहिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत रिया चक्रवर्ती

Rhea Chakraborty Birthday : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)...

The Kashmir Files director Vivek Agnihotri slams Dia Mirza after her tweet for Uddhav Thackeray nrp 97 | उद्धव ठाकरेंचे समर्थन केल्यामुळे दिया मिर्झा...

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ उलथापालथ पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील ४८ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर सरकार अल्पमतात आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी...

विधिमंडळाच्या अधिवेशनाची तारीख बदलली, एक दिवसानं अधिवेशन ढकललं पुढे

Assembly session : विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख बदलली आहे. विधानसभेचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलण्यात आलं आहे. शनिवारी आणि...

Sanjay Raut : संजय राऊत ईडी कार्यालयाबाहेर, दहा तास चालली चौकशी 

Sanjay Raut Ed Inquiry : दहा तासांच्या चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत  (Sanjay Raut)  ईडी  कार्यालयाबाहेर पडले आहेत....

आमचा शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प : एकनाथ शिंदे

मुंबई, 1 जुलै : शिवेसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज 'न्यूज18 लोकमत'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आगामी...