Saturday, November 27, 2021
Home करमणूक सिद्धार्थने शेयर केलं कॅप्टन विक्रम बत्रांनी लिहिलेलं पत्र; वाचून तुम्हीही व्हाल भावुक

सिद्धार्थने शेयर केलं कॅप्टन विक्रम बत्रांनी लिहिलेलं पत्र; वाचून तुम्हीही व्हाल भावुक


मुंबई, 18 ऑगस्ट- बॉलिवूड (Bollywood)  अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या (Siddharth Malhotra) ‘शेरशाह’(Shershaah) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सिद्धार्थ आणि कियाराच्या अभिनयाचं मोठं कौतुकदेखील केलं जातं आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्राची (Capten Vikram Batra) भूमिका साकारून सर्वांचचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपट रिलीज नंतर सिद्धार्थ दिल्लीमधील वॉर मेमोरियलमध्ये गेला होता. त्याठिकाणी त्याने 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या सर्व जवानांबद्दल आदर व्यक्त केला. यासंदर्भात सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्टसुद्धा शेयर केली होती. ती पोस्ट खूपच पसंत केली गेली होती. तसेच त्या पोस्टने सर्वांचे डोळे पाणावले होते. पाहूया काय होती नेमकी पोस्ट.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने दोन दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली होती. या पोस्टमध्ये त्याने कॅप्टन विक्रम बत्रा यांनी स्वतः लिहिलेलं पत्र त्याने शेयर केलं होतं. हे पत्र पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. सिद्धार्थने शेयर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ‘मी दिल्लीमध्ये विक्रम बत्रा आणि सर्व जवानांनं अभिवादन करण्यासाठी गेलो होती. कॅप्टन बत्राच्या पत्राचा उल्लेख करत सिद्धार्थ म्हणतो, ‘ते युद्धात असतानादेखील आपल्या कुटुंबाला आणि जवळच्या व्यक्तींना असचं पत्र लिहित होते.असाच असामान्य मनाचा आपला जवान असतो. मी जेव्हा हे पत्र वाचत होतो. तेव्हा मी विक्रम बत्रांना माझ्या डोळ्यासमोर हसतमुख पाहात होतो. असं मला असं जाणवत होतं की ते आजूबाजूला बॉम्ब पडत असताना त्यामध्ये बसून हे पत्र लिहित आहेत’.

(हे वाचा: चाहत्यांना नाही आवडला अनिल कपूरच्या मुलीचा Bridal Look; पारंपरिक नाही तर…)

सिद्धार्थ पुढे म्हणतो, ‘त्यांनी जणू काही हे पत्र लिहिण्यासाठी एक शांत असा कोपराचं शोधून काढला असावा. ते जेव्हा आपल्या युद्धभूमीवर परत जातात, तेव्हा ते खूपच घातक होतात. ते देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढायला जात होते. मात्र इथे फक्त 1 विक्रम नाहीय. कारगिलमध्ये आम्ही 527 विक्रम गमावले आहेत.त्यांनी हे दिल मांगे मोअरवालं आयुष्य जगलं होतं. आज आपला उर अभिमानाने भरून आला पाहिजे, कारण आपण आपल्या शहिद वीर जवानांची आठवण काढत आहोत. 75 वा स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा’. सिद्धार्थच्या या पोस्टवर 8 लाखांपेक्षा जास्त लाइक्स आले आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#सदधरथन #शयर #कल #कपटन #वकरम #बतरन #लहलल #पतर #वचन #तमहह #वहल #भवक

RELATED ARTICLES

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

Most Popular

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

मुंबई, 26 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा (st bus strike) संप अखेर मिटल्यात जमा झाला आहे....

Good Health Care Tips: जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या...

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी बड्सचा वापर करतात. परंतु, कानांविषयीच्या तज्ज्ञांच्या मते, असं करणं कानासाठी धोकादायक ठरू शकतं....