या स्वागतामुळे अचंबित झालेले पार्क यांनी त्यांच्या मनातील भावनांना यावेळी वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले की, ‘आज मी विमानतळावर अनेक माध्यम प्रतिनिधींना आणि चाहत्यांना पाहिले, जे आम्हाला भेटायला आणि अभिनंदन करण्यासाठी आले होते. हा माझा असा पहिलाच अनुभव होता. मी सिंधू आणि तिच्या आई-वडिलांचे आभार मानू इच्छितो कारण त्या सर्वांनी मला प्रशिक्षण देण्याची संधी दिली.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूचे मंगळवारी (3 जुलै) दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शेकडो चाहते विमानतळावर जमा झाले होते, तसेच ढोलही वाजवत होते. असे वाटत होते की, जनता त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देत आहे. यावेळी विमानतळावर सिंधूचे वडील पी.व्ही.रमण, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस अजय सिंघानिया आणि अधिकारी विमानतळावर उपस्थित होते.
यावेळी सिंधू म्हणाली, ‘मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे. अनेकांनी माझे अभिनंदन केले. मी बॅडमिंटन संघटना आणि सर्व लोकांचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानते. तसेच पंतप्रधानांनी मला अभिनंदन करण्यासाठी बोलावले आहे. मला पाठिंबा देणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार.”
अशी झाली पार्कसोबत भेट
दरम्यान, पुलेला गोपीचंद यांनी सिंधूला सुपरस्टार बनवले. पहिल्यांदा सिंधूला परदेशी प्रशिक्षक मिळाला, तो होता इंडोनेशियाचा मुल्यो हुंड्यो. तो 2017मध्ये भारतात आला होता, पण तो फार काळ टिकला नाही आणि त्यानंतर सिंधूने दक्षिण कोरियाच्या किम जी ह्युनला प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. सिंधू व्यतिरिक्त किमला सायना नेहवाललाही प्रशिक्षण द्यायचे होते. मार्च 2019 मध्ये किमने कोचिंगची जबाबदारी स्वीकारली आणि ऑगस्टमध्ये सिंधू वर्ल्ड चॅम्पियनही बनली, पण पती आजारी पडल्याने किमला परतावे लागले. यानंतर, सिंधूला प्रशिक्षण देण्याशिवाय पार्ककडे कोणताच पर्याय उरला नाही.
सिंधूचा सामना डाव्या हाताच्या अनेक खेळाडूंशी होणार हे पार्कनी जाणले आणि त्यांनी अॅकॅडमीमधून डाव्या हाताच्या अनेक खेळाडूंना सिंधूविरुद्ध सामना करण्यासाठी बोलावले. तसेच अॅकॅडमीच्या लोकांना सोबत घेत त्यांनी सिंधूचं ट्रेनिंग प्रोग्रॅमची आखणी केली. पार्क यांनी अनेक लहान गोष्टींची सिंधूला माहिती दिली.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#सधच #भरततल #भवय #सवगत #पहन #कच #झल #भवक #महणल #मल #कच #बनवणयसठ