मुंबई, 23 जून : देशात कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढत असताना आणखी तीन व्हायरसचं संकट उभं ठाकलं आहे (Coronavirus cases in India). वेगवेगळ्या राज्यांमध्ये या तिन्ही व्हायरसचे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. तज्ज्ञांनी राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. व्हायरसचा प्रसार होत असल्याचे पुरावे सापडताच स्थानिक पातळीवर लक्ष ठेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत (Zika, Dengue and Chikungunya virus in India).
देशात कोरोनानंतर आता झिका व्हायरसही आढळला आहे (Zika virus in India). चिंताजनक म्हणजे झिकाच्या रुग्णामध्येच डेंग्यू आणि चिकनगुनियाही असल्याचं दिसून आलं आहे. आयसीएमआरने केलेल्या अभ्यासानुसार देशातील बऱ्याच भागात झिका आणि त्यासोबतच डेंग्यू आणि चिकगुनियाही आहे. मेडिकल जर्नल फ्रंटियर्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
गेल्या काही कालावधीत भारतात झिका व्हायरसची गंभीर परिस्थिती पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षीही वेगवेगळ्या राज्यात बरीच प्रकरणं समोर आली होती.
हे वाचा – मांजर खातपित नाही म्हणून डॉक्टरकडे नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहताच मालकाला बसला धक्का
आयसीएमआरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निवेदिता गुप्ता यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबरदरम्यान देशातील 13 राज्यांतील 1475 रुग्णांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी 67 रुग्णांमध्ये झिका, 121 रुग्णांमध्ये डेंग्यू, 10 रुग्णांमध्ये चिकनगुनिया असल्याचं निदान झालं. झिकाच्या सर्व प्रकरणांमध्ये लक्षणं होती. 84 रुग्णांना ताप आणि 78 रुग्णांच्या शरीरावर लाल चकत्या होत्या.
जेव्हा काही नमुन्यांमध्ये झिका-डेंग्यू, झिका-चिकनगुनिया, डेंग्यू-चिकनगुनिया आणि तिन्ही व्हायरस एकत्र दिसले तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं. जर आगामी दिवसात याचा संसर्ग वाढला तर देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण होईल.
हे वाचा – कोरोनानंतर मुलं सतत आजारी पडताहेत? ‘या’ सोप्या उपायांनी वाढवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती
अमर उजाला वृत्तानुसार पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या डॉ. प्रज्ञा यादव यांनी सांगितलं, चाचणी झाल्यानंतर नमुन्यांचं जिनोम सिक्वेंसिंग करण्यात आलं तेव्हा झिका व्हायरसचा आशियाई व्हेरिएंट रुग्णांमध्ये असल्याचं आम्हाला समजलं. तर डेंग्यूच्या चार प्रकारांचे सीरो टाइप मिळाले आेहत. सामान्यपणे एका सिझनमध्ये एक किंवा दोन सीरो टाइपचा संसर्ग पाहायला मिळतो. पण आता देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या सीरो टाइम डेंग्यूचा प्रसार होतो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#सवधन #करनचय #दहशतत #दशत #आणख #खतरनक #वहयरस #तजजञन #कल #Alert