Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या सामनाचा अग्रलेख 'राजकीय भूकंपा'वर नाही तर 'अफगाणिस्तानातील भूकंपा'वर! काय आहे आजच्या लेखात

सामनाचा अग्रलेख ‘राजकीय भूकंपा’वर नाही तर ‘अफगाणिस्तानातील भूकंपा’वर! काय आहे आजच्या लेखात


Shiv Sena Saamana Article  : राज्याच्या राजकारणात खासकरुन शिवसेनेत मोठा ‘भूकंप’ झाला आहे. असं असताना आज सामनाच्या अग्रलेखात काय असेल याची उत्सुकता सर्वांना लागून होती. राजकीय स्थितीवर आणि शिवसेनेच्या भूमिकेबाबत काहीतरी भाष्य असावं असा कयास लावला जात होता. मात्र आजचा सामनाचा अग्रलेख हा थेट अफगाणिस्ताणातील भूकंपाच्या स्थितीवर लिहिण्यात आला आहे. या लेखात अफगाणिस्तानातील निसर्गाच्या प्रकोपावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात शेकडो गावे उद्ध्वस्त करणाऱ्या या विनाशकारी भूकंपानंतर हजारो लोक बेघर झाले आहेत. जे लोक सुदैवाने बचावले, त्यांची घरेदारे, संसार पुन्हा उभे करण्यासाठी जगभरातून माणुसकीचा ओघ अफगाणिस्तानात पोहोचायला हवा, असं लेखात म्हटलं आहे. 

लेखात म्हटलं आहे की,  कायमच जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या अफगाणिस्तानवर आता निसर्गाचा प्रकोप झाला आहे. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अफगाणिस्तानात शक्तिशाली भूकंप झाला. अफगाणच्या पाकटिका प्रांतातील चार जिल्हे या विनाशकारी भूकंपात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. एक हजाराहून अधिक लोक या भूकंपात मृत्युमुखी पडले आहेत.  अफगाणिस्तानातील भूकंपात चार जिल्ह्यांतील शेकडो खेडी उद्ध्वस्त झाली आहेत. भूकंप झाला तेव्हा मध्यरात्रीचे दोन वाजले होते. साखरझोपेची वेळ असल्याने लोकांनाबचावाची संधीही मिळाली नाही. जमीन का हलते आहे हे कळायच्या आत घराचे छत आणि भिंती अंगावर कोसळल्या आणि हजारो लोक ढिगाऱ्याखाली दाबले गेले, असं लेखात म्हटलं आहे.

अग्रलेखात म्हटलं आहे की, संकटाचे भयंकर स्वरूप आणि उपलब्ध असलेली तोकडी यंत्रणा यामुळे तालिबानने जगभरातील देशांना मदत करण्याची विनंती केली आहे. त्यातच भूकंपापाठोपाठ आलेल्या मुसळधार पावसानेही अफगाणिस्तानात हाहाकार उडविला आहे. भूकंपग्रस्त भागासह अनेक जिल्ह्यांना तुफानी पाऊस आणि पुराचा तडाखा बसला. यात हजारो घरे वाहून गेली. आधी भूकंपाच्या तडाख्यात हजारांवर लोक मृत्युमुखी पडले असतानाच काही तासांनी पाऊस आणि पुराच्या तडाख्यातही 400 लोक मरण पावले. लागोपाठ आलेल्या दोन नैसर्गिक आपत्तींमुळे अफगाणिस्तानची जनता हवालदिल झाली आहे. सरकारला एकाचवेळी दोन आघाड्यांवर मदतकार्यासाठी शिकस्त करावी लागत आहे, असं लेखात म्हटलं आहे.  

हजारो बळी घेणाऱ्या भूकंपाची अफगाणिस्तानातून येणारी छायाचित्रे मन सुन्न करणारी आहेत. शेकडो गावे उद्ध्वस्त करणाऱ्या या विनाशकारी भूकंपानंतर हजारो लोक बेघर झाले आहेत. जे लोक सुदैवाने बचावले, त्यांची घरेदारे, संसार पुन्हा उभे करण्यासाठी जगभरातून माणुसकीचा ओघ अफगाणिस्तानात पोहोचायला हवा, असंही लेखात म्हटलं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#समनच #अगरलख #रजकय #भकपवर #नह #तर #अफगणसतनतल #भकपवर #कय #आह #आजचय #लखत

RELATED ARTICLES

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

फोनला ठेवा बॅक्टेरिया फ्री, आजार राहतील दूर; ‘या’ टिप्स येतील कामी

How to Clean Your Phone: करोना व्हायरस महामारीनंतर लोक स्वच्छतेबाबत अधिक जागृक झाले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने आता विशेष काळजी घेतली जाते. व्हायरस, जंतूपासून...

मलेशिया बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, प्रणॉयचा पराभव

पीटीआय, क्वालालम्पूर : दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूचे मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. चायनीज तैपेईच्या ताय झू यिंगकडून तीन...

तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना कामावरून का काढलं? Byju’s नं अखेर सांगितलं मोठं कारण

मुंबई, 01 जुलै: 27 जून रोजी संध्याकाळी बायजूस कंपनीनं (Byjus Company) त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यवस्थापक आणि एचआरचे फोन...

अखेर बाप-लेकीची होणार भेट? अभिजीत खांडकेकरच्या भूमिकेत येणार मोठा ट्विस्ट

मुंबई: 'तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यामध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या (Abhijeet Khandkekar)...

Best Plan: ‘या’ प्लानने उडविली Jio ची झोप, वर्षभराच्या व्हॅलिडिटीसह ९१२ GB डेटा आणि फ्री Hotstar सह मिळताहेत हे बेनिफिट्स

नवी दिल्ली: Best Airtel Plans: Airtel ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. Reliance Jio नंतर, Airtel ही एकमेव कंपनी आहे. ज्याचा...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...