
या राशींच्या लोकांकडे असतो सगळ्यात जास्त पैसा
आज रविवार 25 जुलै 2021 .आषाढ कृष्ण द्वितीया. या आठवड्यात गुरू कुंभ राशीत असून, वक्री शनि मकर राशीत आहे. शुक्र मंगळ सिंह राशीत स्थित असून सूर्य कर्क राशीत राहणार आहे. राहू वृषभ राशीत तर केतू वृश्चिकेत असणार आहे.या आठवड्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे बुध कर्क राशीत येत्या 25 तारखेला प्रवेश करणार असुन सर्व राशींना त्याचे काय फळ मिळेल ते आज पाहूया.
आज रविवार 25 जुलै 2021: आषाढ कृष्ण द्वितीया. या आठवड्यात गुरू कुंभ राशीत असून, वक्री शनि मकर राशीत आहे. शुक्र मंगळ सिंह राशीत स्थित असून सूर्य कर्क राशीत राहणार आहे. राहू वृषभ राशीत तर केतू वृश्चिकेत असणार आहे.या आठवड्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे बुध कर्क राशीत येत्या 25 तारखेला प्रवेश करणार असुन सर्व राशींना त्याचे काय फळ मिळेल ते आज पाहूया.
मेष
या आठवड्यात कर्क राशीत प्रवेश करणारा बुध सूर्यासोबत बुधादित्य योग करीत आहे. राशीच्या चतुर्थ स्थानात होणारे हे भ्रमण शुभ असुन घरासाठी अतिशय चांगले फळ देईल. नवीन वास्तू ,गाडी, शोभेच्या वस्तू मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाला महत्व येईल. पंचमात मंगळ शुक्र , संतती साठी विशेष घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. लाभ स्थानातील गुरू विवाहाचे नवीन प्रस्ताव आणील. कार्यक्षेत्रात यश मिळेल पण अडचणी येतील. . अधिकारी वर्ग सहकार्य करणार नाही. एकुण मिश्र फळ मिळतील.
वृषभ
वृषभ राशीच्या तृतीय स्थानात येणारे सूर्य बुध
बहिण भावंडाची मदत मिळवून देण्यासाठी चांगले फळ देतील .वाणी मध्ये माधुर्य येईल. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. मुलाखतीतून यश मिळवून देणारा आठवडा आहे. जुन्या ओळखीच्या लोकांशी संपर्क होईल. घरात काही वाद विवाद होऊ नये यासाठी प्रयत्न कराल. आई वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. तुमचे मनोबल उत्तम राहील.उत्तरार्ध शुभ.
मिथुन
या आठवड्यात धन स्थानात येणारे सूर्य बुध आर्थिक भरभराट करणार आहेत. बौद्धिक पातळीवर तुम्ही विशेष चमकाल. कुटुंब सुख उत्तम राहील .सर्दी पडसे अंग दुखी इत्यादी पडून अष्टमात शनि असल्यामुळे त्रास होत राहील. भावंडाची भेट, त्यांच्याशी काही वाद संभवतात. भाग्य स्थानातील गुरू सर्व अडचणीवर मात करून तुम्हाला यश देणार आहे. परिश्रमाचे फळ नक्की मिळेल.
कर्क
राशीत प्रवेश करणारा बुध सूर्यासोबत बुधादित्य राजयोग करणार आहे. सरकारी कामात यश, प्रमोशन मिळेल . तेजस्वी, आणि बुद्धिवादी व्यक्तिमत्त्व होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. पूर्वार्ध जरा त्रासाचा जाईल. आर्थिक नियोजन नीट करा. अचानक येणारे खर्च आणि मिळकत याची सांगड घालावी लागेल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. अष्टमात गुरू आहे, उपासना करावी.
सिंह
या आठवड्यात राशीतील मंगळ शुक्र तुम्हाला तेजस्वी, आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व बहाल करेल. अनेक जण तुमच्याकडे आकर्षित होतील. विवाह योग येतील. राशीच्या व्यय स्थानात येणारे रवि बुध कायद्याचे उल्लंघन करू नका असा सल्ला देत आहेत. परदेश प्रवास, उच्च शिक्षणात भरघोस यश, असे ग्रहमान आहे. शत्रू वर विजय मिळेल. प्रेम विवाह यशस्वी होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. आठवडा शुभ आहे.
कन्या
पंचम शनि मुळे सतत जाणवणारी संतती चिंता
थोडी वाढेल. व्यय स्थानात मंगळ शुक्र खर्चाचे प्रमाण वाढवतील. शेअर बाजार मध्ये अति धाडस करू नका. जोडीदाराकडून जास्त अपेक्षा करू नका. कायद्याचे उल्लंघन करू नका. सरकारी कामांसाठी शुभ काळ आहे. नोकरी पेशा व्यक्तींना उत्तम काळ. कुटुंब तुमची प्राथमिकता राहील. उत्तरार्ध जरा त्रासाचा.
मंगळ दान व जप करावा .
तुला
दशमातील रवि बुध कार्य क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करून देण्यात मदत करतील. लाभ होतील मित्र मैत्रिणींसोबत मौज मजेचे प्लान बनतील .पण जरा जपून. चतुर्थ स्थानात शनि कुटुंबामध्ये काही नकारात्मक मानसिकता वाढवेल. अष्टमात राहू प्रकृतीची काळजी घ्यावी असे सुचवतो. आई वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. उत्तरार्ध शुभ राहील.
वृश्चिक
तृतीय स्थानातील शनि, प्रवास, भावंडाशी मतभेद सुचवतो. गुरु कृपा राहील त्यामुळे कुटुंब सुख भरपूर मिळेल. भाग्य स्थानातील सूर्य बुध उत्तम फळ देण्यास तयार आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. सूर्य शनि प्रतियोग कायदा पाळा, वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या असे सांगतात. दशमातील मंगळ अचानक जोरदार संधी मिळवुन देणार आहे. परिश्रमाचे फळ मिळेल . पूर्वार्ध अनुकूल आहे
धनु
तृतीय स्थानातील गुरू प्रवास आणि सुखद नाते संबंध दर्शवतात. अनेक लाभ ,भाग्य स्थानातील शुक्र मंगळ मिळवुन देतील. फक्त सरकारी कामात दिरंगाई, अडथळे निर्माण होतील. अष्टमात रवि बुध काही पोटा संबंधी विकार असतील तर काळजी घ्यावी असे सांगतात. आर्थिक नियोजन गडबड होणार आहे. पूर्वार्ध अनुकूल आहे
मकर
आज राशीतील शनि सूर्य बुध प्रतियोगात असल्यामुळे काही जोडीदारा संबंधी प्रश्न निर्माण करतील. अष्टमात आलेले शुक्र मंगळ प्रकृतीच्या समस्या निर्माण करतील. वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाजु चांगली राहील. संतती संबंधी काही चिंता राहील. उत्तरार्ध जरा जपून राहण्याचा संकेत देतो आहे. शनिचा जप करावा.
कुंभ
राशीच्या समोर आलेले मंगळ शुक्राचे प्रभावक्षेत्र तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण करेल. फक्त वादावादी करू नका. जोडीदाराकडून छान भेट वस्तु मिळतील. नोकरीत शुभ समाचार मिळतील. अविवाहित व्यक्तींना नवीन संधी प्राप्त होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. घरांमधे वातावरण ठीक राहील. पाहुणे येण्याची शक्यता आहे. पूर्वार्ध प्रतिकूल. गुरु कृपा राहील.
मीन
प्रवास,खरेदी, मोठे समारंभ, खरेदीचा हा आठवडा आहे. षष्ठ स्थानातील मंगळ शुक्र प्रकृतीची काळजी घ्या असे सुचवीत आहेत. राहू,प्रवास आणि जनसंपर्क सुधारेल. बारावा गुरू शुभ कार्यासाठी खर्च दाखवतो. आर्थिक लाभ होतील पण संथपणे. संतती संबंधी काही निर्णय घ्याल. उत्तरार्ध शुभ आहे.बंधु भेट होईल. धार्मिक कार्य घडेल.
शुभम भवतु!!
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#सपतहक #रश #भवषय #य #आठवडयत #ठरवलल #पलन #हतल #क #परण #जणन #घय #तमचय #रशत #कय #आह