हायलाइट्स:
- सहदेव आणि बादशाहच्या व्हिडीओने पार केला लाखो व्हिव्यूचा टप्पा
- सोशल मीडियावर सहदेवच्या गाण्याचा धुमाकूळ
- बादशाहने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत केलं सहदेवचं कौतुक
सहदेवचं ‘बचपन का प्यार’ सोशल मीडियावर इतकं लोकप्रिय झालं होतं की नेटकऱ्यांसह अनेक कलाकारांनीही या गाण्यावर रील्स बनवून चाहत्यांसोबत शेअर केले होते. सोशल मीडियावर हे गाणं ऐकून बादशाहने सहदेवसोबत गाणं बनविणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर बादशाहने सहदेवला मुंबईला भेटायला बोलावलं होतं. आपला शब्द खरा करत बादशाहने सहदेवसोबतचं गाणं प्रदर्शित केलं आहे. व्हिडिओत सहदेव बादशाहसोबत नृत्य करताना दिसत आहे. तर गाण्यात बालपणापासून तरुणपणापर्यंतची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. हे गाणं बादशाहने त्याच्या ऑफिशिअल युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केलं आहे.
यासोबतच बादशहाने इन्स्टाग्रामवर सहदेवचा एक व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं, ‘सहदेव जेव्हा तू मला भेटायला तुझ्या गावाहून मुंबईला आलास तेव्हा माझ्यासाठी एक भेट घेऊन आलास. सहदेवने दिलेली भेट माझ्या किमती भेटवस्तूंपैकी एक आहे. मी सहदेवच्या उज्ज्वल भविष्याची आशा करतो. मला विश्वास आहे की हे बचपन का प्यार जग कधीही विसरू शकणार नाही.’ असं म्हणत बादशाहने सहदेवचं कौतुक केलं आहे.
रंगकर्मी आंदोलन- इथे पाहा पूर्ण आणि अपूर्ण मागण्यांची यादी
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#सहदव #आण #बदशहच #बचपन #क #पयर #परदरशत #कह #तसत #पर #कल #लखच #आकड