Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया


मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित सात मालमत्तांवर धाड टाकली. या धाडीदरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी अनिल परबांची अनेक तास चौकशी केली. ईडीकडून सलग 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल परबांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी रत्नागिरीच्या दापोली येथील साई रिसॉर्टवरुनच संबंधित कारवाई केली गेल्याची माहिती दिली.

अनिल परब नेमकं काय म्हणाले?

“ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज माझ्या शासकीय निवासस्थानावर, मी जिथे राहतो त्या घरावर, माझ्याशी संबंधित काही लोकांवर छापे घातलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या बातम्या सतत येत होत्या. ईडीची कारवाई होणार अशाप्रकारच्या बातम्या सतत येत होत्या. या मागचा गुन्हा काय? हे तपासलं असता दापोली येथील साई रिसॉर्ट जे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, या रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत. त्यांनी त्यांचा मालकी हक्क सांगितला आहे. त्यांनी कोर्टातही तसा दावा केला आहे. त्यांनी त्यांच्या खर्चाचा सर्व हिशोब दिलेला आहे. आयकर विभागला हिशोब दिला आहे. त्यांच्यावर आयकर विभागाचीदेखील काही दिवसांपूर्वी धाड पडली होती. एवढं सगळं झालं असताना हे रिसॉर्ट अजूनही चालू झालेलं नाही. रिसॉर्टचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही”, असं अनिल परब म्हणाले.

(सकाळी ठाकरे, संध्याकाळी पवारांना मोठा दणका; अविनाश भोसले यांना CBI कडून अटक)

“असं असताना पर्यावरणाची दोन कलमे लावून या रिसॉर्टमधून सांडणारी समुद्रात जातं अशाप्रकारचा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. जे रिसॉर्ट चालूच नाही, ज्याबद्दल प्रदुषण महामंडळाने निकाल दिलेला आहे, प्रांताने, पोलिसांनी रिसॉर्ट चालू नाही, असा निकाल दिला आहे. तरीसुद्धा साई रिसॉर्ट आणि माझ्या नावाने नोटीस काढली गेली. एक तक्रार काढली गेली. त्या तक्रारीवरुन ईडी अधिकाऱ्यांनी माझ्यावर ही छापेमारी केली. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत. मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे ज्या यंत्रणा मला प्रश्न विचारतील त्यांना उत्तर द्यायला मी बांधील आहे. त्यांना यापूर्वीदेखील मी उत्तर दिलेलं आहे”, असं अनिल परब म्हणाले.

तुमच्या शहरातून (मुंबई)

 • BREAKING : विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर, 10 जागांसाठी कुणाला मिळणार संधी?

  BREAKING : विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर, 10 जागांसाठी कुणाला मिळणार संधी?

 • ईडीकडून सलग 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणते प्रश्न विचारले?

  ईडीकडून सलग 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणते प्रश्न विचारले?

 • BIG BREAKING: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड, परबांच्या संबंधित सात मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी

  BIG BREAKING: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड, परबांच्या संबंधित सात मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी

 • मोठी बातमी : कोरोना बाधितांच्या संख्येत होतेय वाढ; रुग्णवाढ कायम राहिली तर मुंबईत निर्बंध लागण्याची शक्यता

  मोठी बातमी : कोरोना बाधितांच्या संख्येत होतेय वाढ; रुग्णवाढ कायम राहिली तर मुंबईत निर्बंध लागण्याची शक्यता

 • Sanjay Raut: आम्ही देखील पाहून घेऊ, ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा

  Sanjay Raut: आम्ही देखील पाहून घेऊ, ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा

 • LIVE : हाताला काळ्या फिती, डोळ्यांमध्ये संताप, शिवसैनिक अनिल परबांच्या घराबाहेर, पोलीसही सतर्क, Live Video

  LIVE : हाताला काळ्या फिती, डोळ्यांमध्ये संताप, शिवसैनिक अनिल परबांच्या घराबाहेर, पोलीसही सतर्क, Live Video

 • 'हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार', शिवसेनेचे संयमी नेते एकनाथ शिंदे भडकले

  ‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, शिवसेनेचे संयमी नेते एकनाथ शिंदे भडकले

 • "देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी" ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्यांचं मोठं वक्तव्य

  “देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी” ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्यांचं मोठं वक्तव्य

 • Rajya Sabha Election: शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, संभाजीराजेंची भूमिका काय? लवकरच निर्णय करणार जाहीर

  Rajya Sabha Election: शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, संभाजीराजेंची भूमिका काय? लवकरच निर्णय करणार जाहीर

 • BREAKING: मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित, कर्मचाऱ्यांची तारांबळ

  BREAKING: मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित, कर्मचाऱ्यांची तारांबळ

 • Sambhaji Raje: महाराजांसमोर नतमस्तक होणाऱ्या फोटोसह संभाजीराजेंचं भावनिक ट्विट, "महाराज.... तुमच्या नजरेतलं स्वराज्य...."

  Sambhaji Raje: महाराजांसमोर नतमस्तक होणाऱ्या फोटोसह संभाजीराजेंचं भावनिक ट्विट, “महाराज…. तुमच्या नजरेतलं स्वराज्य….”

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सलग #तसचय #चकशत #ईडन #कय #परशन #वचरल #अनल #परबच #पहल #परतकरय

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Mumbai Rain Update 2022 :दादर ,परळ, सायन भागात पावसाला सुरुवात, मुंबई ठाण्याला रेड अलर्ट : ABP Majha

<p>Mumbai Rain Update 2022 :दादर ,परळ, सायन भागात पावसाला सुरुवात, मुंबई ठाण्याला रेड अलर्ट : ABP Majha&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ, परशुराम घाट 9 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद 

मुंबई: सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून 9...

India vs West Indies ODI Series Irfan Pathan questioned selection committee over Virat Kohli and Rohit Sharma rest Decision vkk 95

India Tour of West Indies : इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. तिथे दोन्ही देशांदरम्यान तीन एकदिवसीय आणि...

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल, पाहा कोणाला मिळणार संधी…

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना गुरुवारी होणार आहे. या सामन्यासाठी भारताचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असेल. त्यामुळे रोहितने नेतृत्व सांभाळल्यावर तो संघात...

Birthmark: जन्मजात शरीरावरील खुणांचे असते विशेष महत्व; म्हणून लकी ठरतात ही माणसं

मुंबई, 06 जुलै : काही लोकांच्या शरीरावर जन्मापासूनच काही खुणा दिसतात, ज्याला आपण जन्मखूणही म्हणतो. हे जन्मचिन्ह काहीही असू शकते. शरीरावर दिसणार्‍या काही...

Weight Loss Story : 68 किलोवर पोहचलं होतं वजन, ‘ही’ साधीसोपी ट्रिक वापरून फक्त 4 महिन्यांत घटवलं तब्बल 18 किलो वजन, पाणी पिऊन केली...

वजन वाढणे ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे. यामुळे स्वतःलाच जगण्यात रस राहात नाही. रांची येथील पल्लवी पाठक या २२ वर्षीय विद्यार्थिनीची हीच परिस्थिती...