Thursday, July 7, 2022
Home क्रीडा सराव सामन्यात रोहित, कोहलीसह स्टार खेळाडू आले जमिनीवर, भरत ठरला भारतासाठी तारणहार

सराव सामन्यात रोहित, कोहलीसह स्टार खेळाडू आले जमिनीवर, भरत ठरला भारतासाठी तारणहार


लंडन : इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला सराव सामन्यातच लोटांगण घालण्याची वेळ आली आहे. या सराव सामन्यात भारताचे रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे स्टार खेळाडू धारातीर्थी पडल्याचे पाहायला मिळाले. भारत आणि लिसेस्टरशायर यांच्यात आज चार दिवसीय सामन्याला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी भारतावर आठ विकेट्स गमावण्याची वेळ आली. पण यावेळी भारताचा युवा यष्टीरक्षक श्रीकर भरत हा संघासाठी धावून आल्याचे पाहायला मिळाले. कारण भरतने यावेळी अर्धशतक झळकावल्यामुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश आले.

सराव सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली, पण त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. कारण भारतीय संघाला ५० धावांमध्ये आपले दोन्ही सलामीवीर गमवावे लागले. रोहित शर्माला यावेळी २५ धावा करता आल्या, तर शुभमन गिल हा २१ धावांवर बाद झाला. त्यानंतरही भारताची पडझड थांबली नाही. कारण त्यानंतर पाच धावांमध्ये भारताचे अजून दोन फलंदाज बाद झाले. श्रेयस अय्यरला यावेळी भोपळाही फोडता आला नाही तर हनुमा विहारी यावेळी तीन धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजाही यावेळी १३ धावांवर बाद झाला आणि भारताची ५ बादद ८१ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी विराट कोहली आणि भरत हे दोघेही खेळपट्टीवर होते. कोहली यावेळी दमदार खेळी साकारेल, असे वाटत होते. पण यावेळी त्याला ३३ धावांवर समाधान मानावे लागले. पण भरत मात्र यावेळी खेळपट्टीवर ठाण मांडून उभा राहीला. भरतने यावेळी आपले अर्धशतकही पूर्ण केले. भारताकडून अर्धशतक झळकावणारा या डावातील तो एकमेव फलंदाज ठरला. भरतने यावेळी आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ७० धावांची झुंजार खेळी साकारली. भरतच्या या खेळीमुळेच भारताला पहिल्या दिवसअखेर ८ बाद २४६ अशी मजल मारता आली. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भरत शतक साजरे करतो का, याकडे भारताच्या चाहत्यांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे उद्याचा दिवस भरतबरोबरच संघासाठी महत्वाचा असेल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#सरव #समनयत #रहत #कहलसह #सटर #खळड #आल #जमनवर #भरत #ठरल #भरतसठ #तरणहर

RELATED ARTICLES

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

Male Fertility : दररोज Sex करत असाल तर सावधान…कारण…

कस्तुरबा मेडिकल कॉलेज, MAHE-मणिपाल आणि युनिव्हर्सिटी ऑफ म्युन्स्टर, जर्मनीच्या संशोधकांनी Ejaculationची लांबी आणि त्याचा स्पर्म्सवर होणारा परिणाम यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अस्वीकरण:...

Most Popular

मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते लाल चंदन, त्वचेच्या ‘या’ समस्याही होतील दूर

मुंबई 6 जुलै : मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. वय वाढल्यानंतर अनेकांमध्ये मधुमेहाचा त्रास सुरू होतो. आजकाल तर कमी वयात देखील...

Prajakta Mali: ‘…यही मेरा इश्क है’, जुन्या आठवणींमध्ये रमली अभिनेत्री प्राजक्ता माळी

मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali Latest Photoshoot) हिने शेअर केलेले अनेक फोटोज व्हायरल होत असतात. 'रानबाजार' (Raanbaazaar) फेम ही अभिनेत्री सोशल मीडियावर...

Live : पंतप्रधान मोदींनी स्वीकारला मुख्तार अब्बास नकवींचा मंत्रिपदाचा राजीनामा

शिवसेनेला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे आता बंडखोर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. त्यांनी...

OnePlus TV 50 Y1S Pro चा पहिला सेल आज, डिस्काउंटसह मोठ्या स्क्रिनचा टीव्ही स्वस्तात घरी येणार

नवी दिल्ली: OnePlus TV 50 Y1S Pro price: OnePlus ने या आठवड्याच्या सुरुवातीला Y सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला असून...

पावसाळ्यात खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही टिप्स

मुंबई, 6 जुलै : पावसाळ्यात वातावरण गार आणि ओलसर असते. पावसाळ्याची (Rainy Season) मजा तर सर्वजण घेतात. मात्र पावसाळ्यात घरातील अन्न (Food Storage...

Male Fertility : दररोज Sex करत असाल तर सावधान…कारण…

कस्तुरबा मेडिकल कॉलेज, MAHE-मणिपाल आणि युनिव्हर्सिटी ऑफ म्युन्स्टर, जर्मनीच्या संशोधकांनी Ejaculationची लांबी आणि त्याचा स्पर्म्सवर होणारा परिणाम यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अस्वीकरण:...