Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिन होण्याची शिंदे गटासमोर अट? प्रकाश आंबेडकरांचं ट्वीट

सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिन होण्याची शिंदे गटासमोर अट? प्रकाश आंबेडकरांचं ट्वीट


Prakash Ambedkar Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातल्या राजकीय उलथापालथीवर प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्वीट केलं आहे. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट शिंदे गटासमोर ठेवलीय का असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा होऊ लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे? असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. 

प्रकाश आंबेडकर काय बोलतात याचा भाजपशी काही संबंध नाही- अतुल भातखळकर 
यावर बोलताना भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, प्रकाश आंबेडकर काय बोलतात याचा भाजपशी काही संबंध नाही. याआधीही त्यांनी अशी अनेकदा चित्रविचित्र वक्तव्य केलेली आहेत. शिवसेनेत सध्या जे काही सुरु आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही, असंही भातखळकर म्हणाले. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी, कामासाठी संघर्ष करत राहू. हे सरकार अंतर्विरोधानं भरलेलं सरकार आहे. तिन्ही पक्ष एकमेकांशी भांडतात, हे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत स्पष्ट झालं आहे, असंही भातखळकर म्हणाले. 

एकनाथ शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव- सूत्र

शिवसेनेत सर्वात मोठं बंड करून ठाकरे सरकारला हादरा दिल्यानंतर आता भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांचं एकत्र सरकार स्थापन करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. भाजपला आता एकनाथ शिंदे यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. भाजपच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतल्यानंतर पुढच्या घडामोडी घडतील.

इतर महत्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची तयारी मागील 6 महिन्यांपासून, गृहखात्याकडून मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतरही दुर्लक्ष : सूत्र 

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्र्यांची भावनिक साद, शिंदे मात्र ठाम; राज्यात सत्ता पेच, दोन दिवसांत काय-काय घडलं?

राजकीय संकट घोंघावतंय…SID कडून सरकारला दोन महिन्यांपूर्वीच बंडखोरीची कल्पना

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सरकर #सथपन #करणयसठ #भजपमधय #वलन #हणयच #शद #गटसमर #अट #परकश #आबडकरच #टवट

RELATED ARTICLES

Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू

मुंबई, 6 जुलै: आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्रं म्हणून वापरलं जाणारं ओळखपत्र बनलं आहे. आधारकार्ड आता जवळपास सर्व शासकीय योजनांसाठी गरजेचं असतं. थोडक्यात...

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Raigad Rains :  रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ABP Majha

<p>&nbsp;रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ,&nbsp; कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून , पुढील ३ दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'</p> अस्वीकरण:...

Most Popular

पावसाळ्यात खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही टिप्स

मुंबई, 6 जुलै : पावसाळ्यात वातावरण गार आणि ओलसर असते. पावसाळ्याची (Rainy Season) मजा तर सर्वजण घेतात. मात्र पावसाळ्यात घरातील अन्न (Food Storage...

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीला अपघात, घटनेचा थरारक Video समोर

औरंगाबाद, 6 जुलै : औरंगाबादमधून (Aurangabad) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे....

Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू

मुंबई, 6 जुलै: आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्रं म्हणून वापरलं जाणारं ओळखपत्र बनलं आहे. आधारकार्ड आता जवळपास सर्व शासकीय योजनांसाठी गरजेचं असतं. थोडक्यात...

शिवसेना पाठोपाठ काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस, तब्बल सात आमदारांवर कारवाई होणार?

मुंबई, 6 जून : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) आता अस्तित्वात नाही. हे सरकार अस्तित्वात होतं तेव्हा ते सरकार कोसळण्याच्या विविध चर्चा...

आमचं पप्पा! वहिनीसाहेबांचा कोल्हापुरी ठसका, धनश्री काडगावकरचा बेस्ट VIDEOव्हायरल

मुंबई, 06 जुलै:  'डोक्यात काय फॉल्टय काय?' असं ठसक्यात  म्हणणाऱ्या 'तुझ्यात जीव रंगला' ( Tujhyat Jeev Rangala) मधील वहिनीसाहेब आठवतायत का? हि  मालिका...

अभिनेत्रीला जोडीदाराकडून मारहाण; फोटो इतके भयंकर की, दाखवणंही कठीण

मुंबई : घरगुती हिंसाचाराचा शिकार होणाऱ्या महिलांसोबत जे घडतं ते ऐकताना अंगावर काटा येतो. मनात विषण्ण करणारी भावना घर करते, आपण किती हतबल...