हायलाइट्स:
- सनी लिओनीच्या घरी शिरला आगंतुक पाहुणा
- आगंतुक पाहुण्याला घालवताना हैराण झाले सनी आणि डेनिअल
- हातात चप्पल घेऊन पाहुण्याला घालवणाऱ्या सनीचा व्हिडिओ व्हायरल
सनीने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, ‘वुमन वर्सेस वाइल्ड. मिस्टर वेबर यांची रिअॅक्शन पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ चित्रीत करताना कोणत्याही कीटकाला इजा झालेली नाही. कारण ते आमच्यापेक्षा फारच जलद होते.’
काय आहे व्हिडिओमध्ये
सनीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती आणि तिचा नवरा डेनिअल वेबर त्यांच्या घरात शिरलेल्या झुरळाला हाकलवून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. झुरळाला हकलवण्यामध्ये सनी आघाडीवर आहे तर तिचा नवरा पाठीमागेच उभा राहिला आहे. सनी हातात चप्पल घेऊन घरात शिरलेल्या झुरळाला बाहेर घालवताना दिसत आहे.
दरम्यान, सनी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरू चाहत्यांसाठी अनेकदा मजेशीर व्हिडिओ शेअर करताना दिसते. सनी तिच्या लुक्सवरून, तिच्या फॅशनवरून कायमच चर्चेत असते. भलेही बॉलिवूडमधील अभिनेत्रींपेक्षा अभिनयाच्याबाबतीत सनी कमी पडत असेल, परंतु फॅशन, स्टाईलच्या बाबतीत ती सर्व अभिनेत्रींपेक्षा सरस आहे. सनीने तिचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर सातत्याने शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोंवर तिचे चाहते भरभरून कॉमेन्ट करत असतात.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#सन #लओनचय #घर #आल #आगतक #पहण #तयल #हकलवतन #हरण #झल #अभनतर #आण #तच #नवर