Thursday, July 7, 2022
Home करमणूक "सत्ता बळकावणार्‍याला नाही तर...", अभिनेते किरण माने यांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया |...

“सत्ता बळकावणार्‍याला नाही तर…”, अभिनेते किरण माने यांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया | Actor Kiran Mane Reaction on CM Uddhav thackeray speech on Eknath Shinde nrp 97राज्यामध्ये सुरु असणाऱ्या राजकीय संघर्षासंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला पदाची लालसा नसल्याचं म्हटलं. मी अयोग्य आहे, हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं, मी लगेचच राजीनामा देईन, असेही उद्धव ठाकरे भाषणादरम्यान म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे हे भाषण ऐकून अनेकांनी त्यावर भावूक प्रतिक्रिया दिली. नुकतंच या भाषणावर अभिनेते किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध राजकीय मुद्द्यांवर, विषयांवर त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकतंच किरण माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्ही बंड केलं की…”, अभिनेता हेमंत ढोमेचे ‘ते’ ट्विट चर्चेत

“अतिशय आत्मविश्वासानं, मनापासून बोलले ! एवढं घडूनही ‘Cool’ आहेत हे लै भारी. सत्तेसाठी तडफडणार्‍या, आक्रस्ताळेपणा करणार्‍या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला. सत्ता बळकावणार्‍याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणार्‍याला इतिहास लक्षात ठेवतो”, असे किरण माने यांनी लिहिले आहे.

आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संख्याबळ, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं : एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी या बंडखोर आमादारांना समोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच तुम्हाला मी नकोय असं स्पष्टपणे सांगितल्यास मी लगेच मुख्यमंत्रीपद सोडेन, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. इतकच नाही तर मुख्यमंत्री आजच आपण मुक्काम वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरुन ‘मातोश्री’वर मुक्काम हलवत असल्याचंही सांगितलं.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. समोर या, आणि सांगा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#सतत #बळकवणरयल #नह #तर #अभनत #करण #मन #यच #मखयमतरयचय #भषणवर #परतकरय #Actor #Kiran #Mane #Reaction #Uddhav #thackeray #speech #Eknath #Shinde #nrp

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

पवईच्या हीरानंदानीत हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग; लाखोंची सामग्री आगीत जळून खाक

Mumbai Powai Fire : पवई च्या हीरानंदानी मधील हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना. अस्वीकरण:...

केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे अ‍ॅव्होकाडो तेल

मुंबई, 6 जुलै : अ‍ॅव्होकाडो (Avocado) फळ हे आपले शारीरिक आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र हे फळ केवळ आरोग्यासाठीच (Avocado Health Benefits)...

शिंदे सरकारचा राऊतांना दणका, किरीट सोमय्यांना दिलासा, नवलानी प्रकरण गुंडाळले

मुंबई,०७ जुलै - शिंदे सरकार(shinde government) स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णयांना एकीकडे स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. काही निर्णयांमध्ये बदलही...

Marathi News : Marathi batmya, मराठी बातम्या, Latest News in Marathi, Live Breaking Marathi News | Lokmat News18

भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. आपल्याकडे तुळस असल्यास रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अवश्य द्यावे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. अस्वीकरण: ही...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

सासरी सापडला कुस्तीपटूचा मृतदेह; मृत्यूच्याआधी फेसबुक लाइव्हमध्ये केला गंभीर आरोप

नवी दिल्ली: दिल्लीच्या उत्तम नगर परिसरात बुधवारी CWE रेसरल शुभम उर्फ राव पृथ्वी सिंह याचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. शुभमने द ग्रेट खलीकडून प्रशिक्षण...