मुंबई, 23 जून : राज्यातील सत्तासंघर्षात महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले असून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे एकत्र सरकार स्थापन होण्यासाठी वेगवान हलचाली सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे समर्थक 50 आमदारांचा गट आणि भाजपा मिळून नवे सरकार स्थापन करणार आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी १४४ हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे…शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक ५० आमदार आणि भाजपचे समर्थक ११४ आमदार असे मिळुन १६४ आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.
शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आणखीही काही आमदार शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहेत. अशात आता नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाची आमदार संख्या पन्नासवर पोहोचणार आहे. संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे आपल्या या शिवसेना गटाचं पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर भाजप राज्यपालांना पत्र लिहून सरकार स्थापनेचा दावा करेल. नव्या सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे, शिवसेनेचे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे.
‘आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचल्याच नाहीत!’ शिवसेना आमदाराचा ‘लेटरबॉम्ब’, वाचा खळबळजनक पत्र
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार असून त्यातील अनेक खासदार आपला नवा गट स्थापन करणार आहेत.ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे आणि कल्याण लोकसभा खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सध्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात आहेत. वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#सततसघरषल #नरणयक #वळण #भजप #सरकरच #मरग #मकळ