Sunday, January 16, 2022
Home मुख्य बातम्या संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन


मुंबई, 26 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा (st bus strike) संप अखेर मिटल्यात जमा झाला आहे. एसटी कर्मचारी कृती समितीच्या ( ST workers Committee) शिष्टमंडळाने परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी (st bus workers) आता कामावर रुजू व्हावे, असं आवाहन केलं आहे.

आज संध्याकाळी मुंबई सेंट्रल मुख्यालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत एसटी कृती समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत परिवहन मंत्री, महामंडळ एमडीसह कृती समितीचे 28 सदस्य उपस्थितीत होते. या बैठकीत एसटी सेवा सुरळीत करण्यासाठी चर्चा झाली.

‘विलीनीकरण मागणी आमची कायम आहे. मात्र दिलेली वेतनश्रेणी अमान्य आहे. यात सुधारणा करावी ही आमची मंत्र्यांकडे मागणी केली. एसटी पुन्हा सुरळीत सुरू झाल्यावर यावर विचार करू हे त्यांनी आश्वासन दिलं आहे. अवास्तव,अवाजवी दंड आकारणी रद्द करण्याचं मंत्र्यांचं आश्वासन दिले आहे, अशी माहिती एसटी कर्मचारी कृती संघटनेचे संदीप शिंदे यांनी दिली.

Airplane | विमानं निवृत्तीनंतर शेवटचं उड्डाण कुठं घेतात? पुढं त्याचं काय होतं?

कर्माचाऱ्यांची आम्हाला काळजी आहे. राज्य सरकारनं वाहतूक सुरू करावी ही मागणी आम्हाला मान्य आहे. आमची कर्मचाऱ्यांना विनंती कामावर या, असं आवाहनही समितीने केलं आहे

तसंच, ‘कर्मचारी आडमुठे नाही. विलीनीकरण झाल्याशिवाय मैदान सोडणार नाही सांगणाऱ्या नेत्यांनी त्याआधीच मैदान सोडलं. काही राजकीय लोकांमुळे आंदोलन भरकटत गेलं. मैदान सोडणाऱ्या नेत्यांना आमच्या कर्मचाऱ्यांची दया नाही आली, असं म्हणत शिंदे यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर टीकास्त्र सोडले.

IND vs NZ : दुसरा दिवस न्यूझीलंडच्या नावावर, सलामीवीरांची अभेद्य भागीदारी
तर,  कर्मचारी संघटनांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. अधिक सुधारित वेतनश्रेणीची त्यांनी मागणी केली. संप मिटल्यावर यावर चर्चा करून निर्णय घेणार आहोत. कर्मचाऱ्यांवर अन्याय करणार नाही.  जाचक अटी रद्द करता येईल का ? याबाबत निर्णय घेणार आहे. राज्य सरकारने नियमित पगार देण्याची हमी घेतली आहे, असं परब यांनी सांगितलं.

7वा वेतन आयोग मागणी त्यांनी केली, यावर विचार करणार आहे. विलीनीकरण मुद्दा सरकारच्या हातात नाही तो निर्णय आल्यावर विचार करता येईल. तोपर्यंत एसटी बंद राहणं म्हणजे सहन न करता येणारं आर्थिक नुकसान आहे.  सतत आर्थिक भार स्वीकारणं शक्य नाही. त्यामुळे  कामगारांनी त्वरित संप मागे घ्यावा, कामगारांचे हक्क अबाधीत ठेवणार आहोत. कर्मचारी संघटना चर्चेत सकारात्मक आहोत. कामावर येण्यास कामगार इच्छुक आहेत त्यामुळे अजून 1 दिवस निलंबन न करण्याचा निर्णय नाही, असंही परब यांनी जाहीर केलं.

उद्या कामावर येणाऱ्या कामगारांवर कारवाई होणार नाही.  आम्ही कोणत्याही मागणीला नाही म्हटलं नाही संप मिटल्यावर आर्थिक अभ्यास करून निर्णय घेणार आहोत. मला आंदोलन नेतृत्व करणाऱ्यांशी घेणेदेणे नाही. फक्त कर्मचाऱ्यांशी घेणं देणं आहे. कामगारांनी कोणाच्या मागे भरकटू नये. संप सुरू राहिला तर कर्मचारी आणि प्रवासी यांना हानिकारक आहे. 500 रोजंदारी कामगारांची सेवा आज समाप्त केली आहे, अशी माहितीही परब यांनी दिली.

Published by:sachin Salve

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सप #अखर #मटल #करमचऱयन #कमवर #जणयच #कत #समतच #आवहन

RELATED ARTICLES

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी...

Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा

मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या कोरोना विरूद्धच्या लढ्यात लस हे सर्वात प्रभावी शस्त्र मानलं जातंय. मात्र मुंबईत...

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत

मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक...

Most Popular

40 नंतरही पंचवीशीतील तारुण्याचा हा आहे फंडा, फक्त लाइफस्टाईलमध्ये करा असे बदल

नवी दिल्ली, 15 जानेवारी : वयाच्या 40 व्या वर्षानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडणं (Wrinkles) दिसू लागतात. तसंच, शरीरात ऊर्जेची पातळी कमी झाल्याचं जाणवू लागतं. म्हणजेच,...

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी...

मुंबईकरांनो, तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक; कुठे अन् किती वाजेपर्यंत असणार मेगाब्लॉक?

Mumbai Local Mega Block News : रविवारच्या सुट्टीनिमित्त तुम्ही काही प्लॅन आखले असतील तर तुमचा खोळंबा होण्याची शक्यता...

विराटचा ‘हा’ निर्णय वैयक्तिक; कर्णधारपद सोडल्यानंतर सौरव गांगुली म्हणाले…

मुंबई : विराट कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून आपली कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. विराट कोहलीने शनिवारी...

कोहलीच्या निर्णयाचं मला आश्चर्य वाटलं नाही, सुनील गावस्कर यांचं मोठं विधान

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील दारूण पराभवानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...