Saturday, May 21, 2022
Home भारत संताप, आक्रोश आणि आभाळाएवढं दुखः; काश्मिरी पंडित राहुल भटच्या घरातील मन हेलावणारे...

संताप, आक्रोश आणि आभाळाएवढं दुखः; काश्मिरी पंडित राहुल भटच्या घरातील मन हेलावणारे दृश्य


श्रीनगरः जम्मू- काश्मीरमध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी बडगाममधील चडूरा येथील तहसील परिसरात घुसून कश्मीर पंडित राहुल भट यांची हत्या केली. राहुल भट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर मोठं दुखः कोसळलं आहे. राहुल भट यांच्या कुटुंबीयांनी दोषींनी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

राहुलच्या हत्येचा मोठा आघात त्यांच्या कुटुंबावर झाला आहे. राहुलची ५ वर्षांची मुलगी गुंजनला. आपल्या वडिलांच्या मृत्यूची कल्पनाही नाही. ती अजूनही आपल्या वडिलांची वाट बघतेय. रोज लवकर घरी येणारा तिचा बाबा अजून आला कसा नाही, हा प्रश्न विचारुन तिने आपल्या आजोबांना भंडावून सोडलं आहे. मात्र, तिच्या या प्रश्नाचे उत्तर हा हतबल बाप देऊ शकत नाहीये.

राहुल भट यांची पत्नी मिनाक्षीला पतीच्या निधनाचा जबर धक्का बसला आहे. मिनाक्षीने दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. राहुल रस्त्याने जाताना येणारे-जाणारे त्यांना सलाम करायचे. त्यांच्या हत्येच्या आधी १० मिनिटे आधी आमचं फोनवर बोलणं झालं होतं. तेव्हा मी त्यांना ही नोकरी सोडण्यासाठी सांगितलं होतं, असं मिनाक्षी सांगतात.

वाचाः पंतप्रधान मोदी श्रीनगरला का जात नाहीत?; काश्मीरी पंडिताच्या हत्येवर भाजप नेत्याचा सवाल

बडगाममध्ये राजस्व विभागात राहुल भट (३५) क्लर्क पदावर कार्यरत होते. गुरुवारी दोन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली. राहुल भट यांच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.

वाचाः दोनदा पंतप्रधान झालात आता पुढे काय?; नरेंद्र मोदींनी दिलं भन्नाट उत्तर

दहशतवाद्यांनी विचारलं राहुल भट कोण आहे?

दहशतवाद्यांनी कार्यालयात घुसून राहुल भट यांचं नाव विचारुन त्यांना गोळी मारली. तेव्हा तिथे चार लोकं होते. दहशतवाद्यांनी विचारलं राहुल भट कोण आहे. तेव्हा त्यांनी राहुल पुढे आले. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, अशी माहिती त्यांचे राहुल यांच्या वडिलांनी दिली.

वाचाः कॉंग्रेसमध्ये एका कुटुंबात एकच तिकीट देण्याचा विचार, अर्थात अपवाद असणार!अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सतप #आकरश #आण #आभळएवढ #दख #कशमर #पडत #रहल #भटचय #घरतल #मन #हलवणर #दशय

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Most Popular

ब्रिटेनमध्ये कोरोना पाठोपाठ मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव; आतापर्यंत 20 रुग्णांची नोंद

Monkey Pox Cases Increase in Britain : कोरोना प्रादुर्भावानंतर आता आणखी एका आजारानं जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनाची...

iPhone Offers: आतापर्यंतची बेस्ट डील ! १,००० रुपयांत घरी न्या iPhone SE, सोबत, 12 Mini, 13 Mini वर सुद्धा जबरदस्त डिस्काउंट

नवी दिल्ली: Best iPhone Deal: तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन प्रेमी असाल, आणि जर Apple iPhones तुम्हाला विशेष आवडत असतील तर, ते खरेदी करण्याची एक...

Mumbai Water Reduction : मुंबईतील ‘या’ भागांत चार दिवस पाणी कपात

Mumbai Water Reduction : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत 24 मे ते 27 मे दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Sony Smart TV: घरच बनेल थिएटर! Sony ने भारतात लाँच केले मोठ्या स्क्रीनसह येणारे ५ स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या फीचर्स-किंमत

नवी दिल्ली : Sony Smart TV Launched: Sony Bravia X80K स्मार्ट टीव्ही सीरीज भारतात लाँच झाली आहे. कंपनीचा लेटेस्ट ४के स्मार्ट टीव्ही लाइनअप...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...