Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या संजय राऊतांवर निलेश राणेंचा एकेरी भाषेत हल्लाबोल, म्हणाले, राऊतांना सेनाभवनात फटके टाकणार!

संजय राऊतांवर निलेश राणेंचा एकेरी भाषेत हल्लाबोल, म्हणाले, राऊतांना सेनाभवनात फटके टाकणार!


मुंबई:  शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. शिवसेनेशी पंगा घेणारा जन्माला यायचाय, असं म्हणत आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांना अग्रलेखातून खडे बोल सुनावण्यात आले आहेत. यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत हल्लाबोल केला आहे. 

शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच… असा माणूस अद्याप जन्माला यायचाय; शिवसेनेचं टीकास्त्र

निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, हे काय ऐकतोय मी की संजय राऊत धमकी द्यायला लागले, संजय राऊत तू फटके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत, अशा शब्दात निलेश राणे यांनी एकेरी भाषेत टीका केली आहे. 

निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, संजय राऊत मोजून बघ. मोबाईलची बटन दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो की होम मिनिस्टर म्हणतो हेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संजय राऊत काय सांगतो, असं राणेंनी म्हटलं आहे. 

Mumbai Local : मुंबई लोकलमध्ये सर्वसामान्यांना परवानगी मिळणार का? मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले…  
निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रात या कुठल्या औलादी जन्माला आलेत ज्याना वाटतं ही अशी फडतूस नावं ठेवून आम्हाला घाबरू शकतात? मला फरक पडत नाही. पोलीस डिपार्टमेंटने हे गंभीरतेने घ्यावं कारण जो माणूस वॉन्टेड दहशतवादी आहे त्याला जर महाराष्ट्रात काही जण देव समजत असतील तर त्यांना आत्ताच ठेचून काढा, असंही राणे यांनी म्हटलं आहे.

सामनामध्ये नेमकं काय म्हटलंय

शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. शिवसेनेशी पंगा घेणारा जन्माला यायचाय, असं म्हणत आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांना अग्रलेखातून खडे बोल सुनावण्यात आले आहेत. शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले (बाटगे) बडबडत आहेत, ते त्यांचे पोटाचे जुने दुखणे आहे. असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही, असं म्हणत अग्रलेखातून भाजपवर तोफ डागली आहे. तसेच शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच… असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.  

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सजय #रऊतवर #नलश #रणच #एकर #भषत #हललबल #महणल #रऊतन #सनभवनत #फटक #टकणर

RELATED ARTICLES

Skin Care Tips – त्वचेवर नैसर्गिक तेज आणण्यासाठी उपयुक्त असते काळी वेलची, असा कर

मुंबई, 13 ऑगस्ट : काळ्या वेलचीच्या वापरामुळे जेवणाची चव तर वाढतेच मात्र जर तुम्ही चहाचे शौकीन असाल. तर चहामधील वेलचीचा सुगंध नक्कीच तुम्हाला मंत्रमुग्ध...

Thackeray vs Shinde : प्रतिसेना भवनावरुन आरोप-प्रत्यारोप ABP Majha

<p>शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे. &nbsp;शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये...

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Most Popular

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

Skin Care Tips – त्वचेवर नैसर्गिक तेज आणण्यासाठी उपयुक्त असते काळी वेलची, असा कर

मुंबई, 13 ऑगस्ट : काळ्या वेलचीच्या वापरामुळे जेवणाची चव तर वाढतेच मात्र जर तुम्ही चहाचे शौकीन असाल. तर चहामधील वेलचीचा सुगंध नक्कीच तुम्हाला मंत्रमुग्ध...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...