Monday, July 4, 2022
Home करमणूक शेवटच्या क्षणी इंडियन आयडलच्या निर्मात्यांनी घेतलाय मोठा निर्णय; असं होणार...

शेवटच्या क्षणी इंडियन आयडलच्या निर्मात्यांनी घेतलाय मोठा निर्णय; असं होणार एलिमिनेशन


हायलाइट्स:

  • इंडियन आयडल १२ च्या ग्रँड फिनालेसाठी निर्मात्यांनी केला मोठा बदल
  • आता ग्रँड फिनालेची स्पर्धा पाच स्पर्धकांमध्ये नाही तर सहा स्पर्धकांमध्ये रंगणार
  • १२ तास चालणा-या सोहळ्यामध्ये २०० हून अधिक गाणी गायली जाणार

मुंबई : इंडियन आयडल १२ कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. परंतु निर्मात्यांनी ग्रँड फिनालेच्या कार्यक्रमामध्ये मोठा बदल केला आहे. या बदलामुळे सगळी गणिते बदलली गेली असून सर्वजण हैराण झाले आहेत.

इंडियन आयडल १२ च्या ग्रँड फिनालेसाठी टॉप सहा स्पर्धक सज्ज झाले आहेत. यामध्ये उत्साही असा पवनदीप राजन, सुरीली अशी ओळख असलेली अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, शन्मुखाप्रिया, निहाल तारो, मोहम्मद दानिश यांचा समावेश आहे. खरे तर गेल्या आठवड्यातच एका स्पर्धक या कार्यक्रमातून बाहेर जाणार होता आणि ही स्पर्धा पाच जणांमध्येच रंगणार होती. सोशल मीडियावर देखील पवनदीप राजन या कार्यक्रमातून बाहेर जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. इतकेच नाही तर पवनदीप राजन नसलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्याचे एलिमिनेशन होणार हे जवळपास नक्की मानले जात होते.

नेमका काय बदल केला
परंतु आता ग्रँड फिनालेमध्ये सहा स्पर्धकांची एंट्री नक्की झाली आहे. ८ ऑगस्ट रोजी प्रसारित झालेल्या भागामधून निर्मात्यांनी एलिमिनेशन राऊंडलामध्ये मोठा बदल केला. त्यामुळे या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेमध्ये मोठा बदल घडून आला. या भागामध्ये जेव्हा एलिमिनिशनची वेळ आली तेव्हा आदित्य नारायणने जाहीर केले की, ज्या स्पर्धकाचे नाव घेतले जाईल, तो फायनलमध्ये जाणार आहे…

त्यानंतर आदित्य नारायणने पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे आणि मोहम्मद दानिश यांची नावे घेतली. त्यानंतर त्याने निहाल तारो आणि शन्मुखाप्रियाचे ही नाव घेतले. या दोघांपैकी एकजणच ग्रँड फिनालेमध्ये जाऊ शकणार होता. त्यानंतर आदित्याने जाहीर केले की,’ग्रँड फिनालेमध्ये जाणारा पाचवा स्पर्धकाचे नाव आहे निहाल प्रिया…’ म्हणजेच ग्रँड फिनालेमध्ये निहाल तारो आणि शन्मुखाप्रिया या दोघांनाही प्रवेश मिळाला. त्यामुळे यावेळचे इंडियन आयडल चा ग्रँड फिनालेच्या ट्रॉफीसाठी पाच नाही तर सहा स्पर्धकांमध्ये होणार आहे.

१२ तास, ४० हून जास्त अॅक्ट आणि २०० गाणी!

इंडियन आयडल १२ च्या ग्रँड फिनाले हा तब्बल १२ तास रंगणार आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा ग्रँड फिनाले आहे. हा ग्रँड फिनाले १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत प्रसारित केला जाईल. त्यानंतर अर्ध्या रात्री या स्पर्धेचा विजेता घोषित केला जाईल. या ग्रँड फिनालेमध्ये ४० हून जास्त
अॅक्ट आणि २०० गाणी गायली जाणार आहेत.

या ग्रँड फिनालेमध्ये संगीत क्षेत्रातील अनेक ख्यातनाम व्यक्ती सहभागी होऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवणार आहेत. या सर्व स्पर्धकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या ग्रँड फिनालेमध्ये फक्त हे सहा स्पर्धकच नाही तर भारतामधील ख्यातनाम गायकही सहभागी होणार आहेत.

आदित्य नारायण आणि जय भानुशाली करणार सूत्रसंचालन
इंडियन आयडल १२ ग्रँड फिनालेसाठी आदित्य नारायण सोबत जय भानुशाली सूत्रसंचालन करणार आहे. फिनालेच्या सुरुवातीला स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधत लष्कारीमधील सैनिकांना गाण्यामधून मानवंदना दिली जाईल. हिंदी सिनेमासृष्टीमधील आघाडीच्या गायकांसोबत हे सहा स्पर्धक जुगलबंदी करणार आहेत. त्यामध्ये शास्त्रीय, डिस्को, पॉप, रॉक इंडी आणि संगीताचे वेगवेगळे प्रकार गायले जाणार आहेत.

प्रत्येकासाठी संस्मरणीय दिवस

इंडियन आयडल १२ च्या ग्रँड फिनालेमध्ये परीक्षक हिमेश रेशमिया, सोनू कक्कर देखील गाणी गाणार आहेत. त्याशिवाय संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा दिवस स्पर्धकांसाठी, परीक्षकांसाठी तसेच प्रेक्षकांसाठीही संस्मरणीय असणार आहे. कार्यक्रमाचे परीक्षक देखील या ग्रँड फिनालेसाठी खूपच उत्सुक आहेत. आता त्यांच्यापुढे या सहा स्पर्धकांमधून विजेता निवडण्याची मोठी जबाबदारी आहे. या तिघांसाठी हा निर्णय घेणे खूपच कठीण असणार आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#शवटचय #कषण #इडयन #आयडलचय #नरमतयन #घतलय #मठ #नरणय #अस #हणर #एलमनशन

RELATED ARTICLES

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित ब्रिटिश दिग्दर्शकाचे निधन, जागतिक स्तरावर सादर केले होते महाभारत

लंडन: प्रसिद्ध चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक पीटर स्टीफन पॉल ब्रुक (Peter Brook Passes Away) यांचे लंडनमध्ये निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. २...

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पालकांनीही लक्षपूर्वक वाचा

CBSE Result cbseresults.nic.in: सीबीएसई बोर्डातून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. कारण, आजच्याच दिवशी विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाचं चीज होणार...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....