Friday, August 12, 2022
Home विश्व शेळीच्या रक्तापासून कोरोनाच्या अँटिबॉडिज

शेळीच्या रक्तापासून कोरोनाच्या अँटिबॉडिज


शेळीच्या रक्तापासून कोरोनाच्या अँटिबॉडिज, बाजारातील लसींपेक्षा हजार पट प्रभावी असल्याचा दावा

सध्या बाजारात असलेल्या लसींपेक्षा कैक पट अधिक शक्तीशाली अँटिबॉडिज (Antibodies) जर्मनीत (Germany) तयार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 30 जुलै : जगभरात गेल्या दीड वर्षांपासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाला (Corona) प्रतिबंध घालण्यासाठी बाजारात सध्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी (Vaccines) उपलब्ध आहेत. मात्र सध्या बाजारात असलेल्या लसींपेक्षा कैक पट अधिक शक्तीशाली अँटिबॉडिज (Antibodies) जर्मनीत (Germany) तयार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या अँटिबॉडिज कोरोनाच्या सध्याच्या स्ट्रेनवरही प्रभावी ठरू शकतात, असा दावा वैज्ञानिकांनी (Scientists) केला आहे.

शेळीच्या रक्तापासून अँटिबॉडिज

सध्या उपलब्ध असलेल्या लसींच्या वापरातून किंवा शरीर तयार असलेल्या कोरोना प्रतिबंधक अँटिबॉडिजचा अभ्यास जर्मनीतील शास्त्रज्ञ करत आहेत. कुठल्या प्रकारे तयार झालेल्या अँटिबॉडिज या अधिक सक्षम ठरतात, याचेदेखील परीक्षण सुरू आहे. त्यातच शेळीच्या रक्तापासून तयार करण्यात आलेल्या अँटिबॉडिज या अधिक परिणामकारक ठरतील, अशी शास्त्रज्ञांना अपेक्षा आहे. सध्याच्या अँटिबॉडिच्या क्षमतेपेक्षा 1 हजार पट अधिक क्षमता या नव्यानं संशोधित करणाऱ्या अँटिबॉडिजमध्ये असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.

असा होतो परिणाम

नव्यानं संशोधित करण्यात आलेल्या अँटिबॉडिज या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतात. शरीरात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर या अँटिबॉडिज त्या व्हायरसच्या पेशींना चिकटून बसतात. त्यामुळे काही काळातच व्हायरस निष्क्रिय होतो, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. या अंटिबॉडिज तयार करण्यासाठी येणारा खर्च हा सध्याच्या लसींपेक्षा अत्यल्प असल्यामुळे अधिकाधिक लोकांसाठी यापासून तयार झालेली लस फायद्याची ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे वाचा -श्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण

शेळीच्या रक्तापासून तयार झालेल्या या लसींवर अद्याप केवळ संशोधन सुरू आहे. त्याची प्रत्यक्ष माणसांवर जेव्हा चाचणी कऱण्यात येईल आणि ट्रायलच्या सर्व फेज पूर्ण होतील, त्यानंतरच याची खरी क्षमता स्पष्ट होणार आहे. या प्रकारच्या लसीचे दुष्परिणाम होऊ शकतात का, यावरदेखील संशोधन सुरू आहे. मात्र हे सर्व  टप्पे लसीनं पार केले, तर मात्र गरीब देशांसाठी ही लस वरदान ठरण्याची शक्यता आहे.


Published by:
desk news


First published:
July 30, 2021, 4:32 PM IST

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शळचय #रकतपसन #करनचय #अटबडज

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

Most Popular

Hair Care : केसांना मुळापासून मजबूत बनवा, ‘या’ टिप्स वापरा

Hair Care Tips : आपल्या व्यस्त आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या केसांवरही होताना दिसतो. अनेक जण सध्या केसांच्या...

Coronavirus : देशात नवे 18053 कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजारांवर

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना...

पावसाळ्यात ओली गादी वाळवणे झालेय कठीण? या सोप्या टिप्स वापरून सुकवा गादी

बेडवरची गादी ओली झाली तर ती सुकवणे पावसाळ्यात सुकवणे अवघड काम असते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने...

Ukraine Russia War : युक्रेनमधील पॉवर प्लांटजवळ रशियाचा हल्ला, भारताचं संयम राखण्याचं आवाहन

Ukraine Russia Conflict : युक्रेनमधील झापोरिझ्झ्या अणू ऊर्जा प्रकल्पाजवळ रशियाकडून हल्ले सुरु आहेत. झापोरिझ्झ्या अणू ऊर्जा प्रकल्प (...

लाल सिंह चड्ढा

आमिर खानच्या नावावर असलेले अनेक चित्रपट हे मुळात इतर भाषांतील चित्रपटांचा रिमेक आहेत किंवा त्या एखाद्या सिनेमाच्या कथानकावरून प्रेरित असलेले आहेत. चोखंदळ असलेला...

WhatsApp आणि Messenger च्या नोटिफिकेशन्सने वैताग आणलाय?, फक्त हे काम करा

नवी दिल्लीः whatsapp and messenger notification : सोशल मीडिया हे आता आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनले आहे. दिवसात किती तरी वेळा व्हॉट्सॲप...