Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या शेतकऱ्यांना दिलासा, 1 जुलैपासून मिळणार 50 हजार रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान

शेतकऱ्यांना दिलासा, 1 जुलैपासून मिळणार 50 हजार रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान


Agriculture News : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आता  हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. यासाठी 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळं शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. 1 जुलै म्हणजे कृषी दिनापासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. 

दरम्यान, 2017-18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास आणि 2018-19 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास त्याचप्रमाणे 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास 2019-20 या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे.  मात्र, 2019-20 या वर्षातील घेतलेल्या तसेच त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. हा लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन 50 हजार रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ निश्चित करण्यात येणार आहे. 

दरम्यान, या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प मुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल. दरम्यान, या सर्व बाबी लवकरच पूर्ण होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर पैसे जमा होणार आहेत. नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी पाठवली असल्याने पुढच्या दोन आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शतकऱयन #दलस #जलपसन #मळणर #हजर #रपयच #परतसहनपर #अनदन

RELATED ARTICLES

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

Male Fertility : दररोज Sex करत असाल तर सावधान…कारण…

कस्तुरबा मेडिकल कॉलेज, MAHE-मणिपाल आणि युनिव्हर्सिटी ऑफ म्युन्स्टर, जर्मनीच्या संशोधकांनी Ejaculationची लांबी आणि त्याचा स्पर्म्सवर होणारा परिणाम यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अस्वीकरण:...

Most Popular

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

शिंदे सरकारचा राऊतांना दणका, किरीट सोमय्यांना दिलासा, नवलानी प्रकरण गुंडाळले

मुंबई,०७ जुलै - शिंदे सरकार(shinde government) स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णयांना एकीकडे स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. काही निर्णयांमध्ये बदलही...

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

माळीणची पुनरावृत्ती नको! भूस्खलनाच्या भीतीने मुळशीतील 14 कुटुंबांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर

<p><strong>Pune News: &nbsp;</strong>पुणे (Pune) जिल्हा प्रशासनाने मुळशी तालुक्यातील गुटके गावातील 14 कुटुंबांना दरड कोसळण्यापासून बचावाचा उपाय म्हणून खोऱ्यातील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी...

OnePlus TV 50 Y1S Pro चा पहिला सेल आज, डिस्काउंटसह मोठ्या स्क्रिनचा टीव्ही स्वस्तात घरी येणार

नवी दिल्ली: OnePlus TV 50 Y1S Pro price: OnePlus ने या आठवड्याच्या सुरुवातीला Y सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला असून...

MS Dhoni : बापरे! वाढदिवसाच्या दिवशी धोनी लंडनच्या रस्त्यावर करतोय ‘हे’ काम

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. आज धोनी 41 वर्षांचा झाला आहे. धोनीचा वाढदिवस केवळ तो आणि...