Friday, August 12, 2022
Home लाईफस्टाईल शेणामुळे बनली जोडी! लगेच इम्प्रेस झालं तरुणीचं कुटुंब; तरुणाशी लावून दिलं लग्न

शेणामुळे बनली जोडी! लगेच इम्प्रेस झालं तरुणीचं कुटुंब; तरुणाशी लावून दिलं लग्न


रायपूर, 02 जुलै : असे बरेच तरुण आहेत ज्यांचं काही ना काही कारणामुळे लग्न होत नाही आहे. वय वाढत जातं पण लग्नासाठी मुलगी मिळत नाही आहे. लग्न व्हावं यासाठी किती तरी उपायही केले जातात. लग्नात अशाच अडचणी येणाऱ्या एका तरुणाला चक्क शेणामुळे नवरी मिळाली आहे. शेणामुळे असा चमत्कार झाला की मुलीचं कुटुंब या तरुणावर इम्प्रेस झालं आणि त्यांनी आपल्या लेकीचं या तरुणाशी लग्न लावून दिलं. छत्तीसगढमधील या दाम्पत्याच्या लग्नाची गोष्ट सध्या चर्चेत आली आहे (Man selling cow dung get married).
असं म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. तसंच विवाह संस्था, मॅरेज ब्युरो, मॅट्रिमोनिअल वेबसाइट्स किंवा अॅपमार्फत आपल्याला हवा तसा जोडीदार मिळतो. पण या दाम्पत्याची जोडी बनली ती शेणामुळे (Godhan yojna).
मनेंद्रगढमध्ये राहणारा श्यामकुमार जायसावल. ज्याच्या लग्नात बरेच अडथळे येत होते. पण शेणामुळे त्याचं आयुष्य पालटलं किंबहुना शेणाने चमत्कारच केला. सरकारच्या गोधन न्याय योजनेअंतर्गत शेण विकून तो लखपती झाला आणि त्यामुळे एका तरुणीचं कुटुंब इतकं इम्प्रेस झालं की त्यांनी तिचं लग्न श्याकुमारशी लावून दिलं. 19 जूनला श्यामकुमारचं लग्न अंजू नावाच्या तरुणीसोबत झालं. श्यामकुमारने सांगितलं, गोधन न्याय योजनेमुळे त्याच्या लग्नातील अडथळा दूर झाला आणि त्याला आयुष्याची जोडीदार मिळाली.
हे वाचा – DTH Dish Recharge संपताच बायकोने मागितला Divorce; नवऱ्याला म्हणाली, ‘TV नहीं तो बीवी नहीं’
राज्य सरकारने केलेल्या एका जाहिरातीनुसार पशुपालन करणाऱ्या श्याम कुमारचं उत्पन्न खूप कमी होतं. त्याने दूध डेअरीचा व्यवसाय सुरू केला होता. पण दुधाइतकीच उत्पनन्न मिळायचं. त्यावर मुश्किलीने त्यांचा उदरनिर्वाह होत होता. सुरुवातीला प्राण्यांचं शेण वायाच जात होतं. पण गोधन न्याय योजना लागू झाल्यानंतर त्याने शेण विकायला सुरुवात केली. आतापर्यंत त्याने 2 लाख 5 हजार किलो गोबर विकलं. त्यातून त्याला 4 लाख 10 हजार रुपये मिळाले.
त्याची पत्नी अंजू नर्सिंग स्टाफ आहे. तिने सांगितलं, माझ्या लग्नासाठी स्थळ शोधले जात होते. त्यावेळी कुटुंबाला श्याम कुमारबाबत समजलं. तो शेण विकून चांगली कमाई करत असल्याची माहिती मिळाली. तसंच आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ते खूप मेहनत करत होते. यामुळे तिचे वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य प्रभावित झाले आणि अंजूचं लग्न श्यामकुमारशी लावण्याची तयारी दर्शवली.
हे वाचा – ‘नवरा भाड्याने देणं आहे’, बायकोने सोशल मीडियावर दिली जाहिरात; कारणही आहे शॉकिंग
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सध्या नागरिकांची भेट घेत आहेत. बुधवारी कोरिया जिल्ह्यात ते गेले असता चर्चेदरम्यान गोधन न्याय योजनेचा विषय निघाला. त्यावेळी या नवविवाहित दाम्पत्याने आपल्या लग्नाचा किस्सा मुख्यमंत्र्यांना सांगितला. या योजनेचा आपल्या आयुष्यात किती मोठा फायदा झाला हे त्यांनी सांगितलं.
तरुणाच्या लग्नातील अडथळे शेण विकल्याने दूर झाले, शेण विक्रीतून झालेल्या कमाईमुळे त्याचं लग्न झालं, असा दावा केला जातो आहे. शेण विकणं किंवा शेणासंबंधी व्यवसाय करणं तुम्हाला कमीपणाचं वाटत असेल पण ते किती फायद्याचं आहे, हे इथं दिसून येतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#शणमळ #बनल #जड #लगच #इमपरस #झल #तरणच #कटब #तरणश #लवन #दल #लगन

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

Girish Mahajan at Jalgaon : मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन यांचं जळगावात जंगी स्वागत

Girish Mahajan at Jalgaon : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) आज प्रथमच जळगावमध्ये...

मुंबईकरांनो सावधान! शहरात एका दिवसात 79% कोरोनाचे रुग्ण वाढले

 आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : श्रीशंकरला सहावा क्रमांक

मोनॅको : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता लांब उडीपटू मुरली श्रीशंकरला पदार्पणीय डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये सहावा क्रमांक मिळवत निराशा केली. ७.९४ मीटर ही...

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

दैनंदिन राशीभविष्य: धनु राशीसाठी आज सांभाळून राहण्याचा दिवस; तर कुंभ राशीला लाभ

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस आनंद निर्माण करणारा...

‘छोटू भैय्या तू बॅट बॉल खेळ’; पंत आणि उर्वशीमध्ये जोरदार जुंपली

Urvashi Rautela Reply On Rishabh Pant- प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याने इन्स्टाग्राम स्टोरीवर उर्वशीचं नाव न घेता, 'ए बहीण माझा पाठलाग सोड' अशी...