दरम्यान, एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदारची रद्द करा अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पिटीशन दाखल केल्याचंही शिवसेना नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असताने न आल्याचं कारण देत शिवसेनेने 12 आमदारांविरोधात कारवाई केली आहे.
मात्र ही प्रक्रिया इतकी सोपी नाही. याबाबत तक्रार केल्यानंतर प्रत्येक आमदाराला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात येईल. या प्रकरणात आमदाराच्या वागणुकीकडेही लक्ष दिलं जाईल. सर्व पुरावे पाहिल्यानंतर अध्यक्ष यावर निर्णय घेतली, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.
‘या’ नेत्यांची आमदारकी रद्द करा – शिवसेना
एकनाथ शिंदे
अब्दुल सत्तार
यामिनी जाधव
संजय शिरसाठ
बालाजी किणीकर
तानाजी सावंत
संदिपाम भुमरे
भारत गोगावले
लता सोनावणे
अनिल बाबर
महेश शिंदे
प्रकाश सुर्वे
एकनाथ शिंदेंचा ट्विटरवरुन इशारा
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेला ट्विटरवरुन प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत”, असंदेखील ते म्हणाले. “आम्ही कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे”, असं शिंदे म्हणाले.
तुमच्या शहरातून (मुंबई)
Published by:Chetan Patil
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#शवसनचय #आमदरचय #सवकषऱय #एकनथ #शदच #गटनतपद #पनह #नयकत