Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, पण...; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, पण…; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य


Maharashtra Political Crisis Sanjay Raut :  शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन राऊत यांनी दिले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारले आहे. 

‘वर्षा’ निवासस्थानात आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे आमदार कैलाश पाटील आणि नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांनी सूरतमधून कशी सुटका केली, याबाबत अनुभव मांडले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, बाहेर असलेल्या शिवसेना आमदारांना जर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा असे वाटत असेल तर तोदेखील विचार करू. मात्र, तुम्ही आधी 24 तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करावी असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, पत्रकारांना व इतरांना व्हॉट्सअॅपवर हॉटेलमधील फोटो, व्हिडिओ पाठवण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन चर्चा करावी. आमचा गुवाहाटीमधील 21 आमदारांसोबत संपर्क झाला असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली. राऊत यांनी म्हटले की, राज्याबाहेर गेलेले शिवसेनेचे 20-25 आमदार पुन्हा शिवसेनेत येतील असा विश्वास आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी इच्छा असेल तर तुम्ही प्रत्यक्षात भेटून चर्चा करावी. मात्र, त्यांचा हा बहाणा असल्याचे राऊत यांनी म्हटले. सरकारमधून बाहेर पडावे असं त्यांना वाटत असते तर त्यांनी प्रत्यक्षात चर्चा केली असती, असेही राऊत यांनी म्हटले.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

संजय राऊत यांनी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार करू असे म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील बुधवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्याबाहेर असलेल्या शिवसेना आमदारांना पुन्हा राज्यात परतण्याचे आवाहन केले होते. प्रत्यक्षात भेटून चर्चा करावी असे आवाहन केले होते. शिवसेना आमदारांना दुसरा मुख्यमंत्री हवा असेल तर त्यालाही आपण तयार असून मात्र, त्यासाठी ती मुख्यमंत्रीपदाची व्यक्ती शिवसैनिकच असावी असे म्हटले होते. 

पाहा व्हिडिओ: Eknath Shinde गटानं 24 तासात परत यावं, मग तुमच्या मागणीचा विचार करु: संजय राऊत

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शवसन #महवकस #आघडतन #बहर #पडयल #तयर #पण #सजय #रऊतच #मठ #वकतवय

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

Most Popular

Firing in Denmark Mall: पॉप स्टारच्या कॉन्सर्टआधी मॉलमध्ये बेछूट गोळीबार; तीन जण ठार

कॉपेनहेगनः डेन्मार्कमधील एका शॉपिग मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. रविवारी झालेल्या या गोळीबारात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला...

‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचा एकाच महिन्यात येतो दोनदा बर्थडे, काय आहे हे गुपित?

मुंबई 04 जुलै: मिर्झापूरमध्ये एका गँगस्टरच्या रूपात आलेले बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या एकदम प्रकाशझोतात असतात. ज्या वयात लोक रिटायरमेंट कडे...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

शुगर कंट्रोलमध्ये राहील; Diabetesअसणाऱ्यांना दुधाविषयी या गोष्टी माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 04 जुलै : दुधाला संतुलित आहार म्हणून ओळखले जाते. कारण त्यात सर्व पोषक घटक असतात. त्यामुळे लहानपणापासूनच दूध पिण्यावर भर दिला...

मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी, इतर भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...