Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या शिवसेना भवन फोडू म्हणणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा यु-टर्न!

शिवसेना भवन फोडू म्हणणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा यु-टर्न!


मुंबई, 31 जुलै : ‘आम्ही भाजपच्या (bjp) कार्यक्रमला आलोय. यांना वाटतंय की शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) तोडायला आले की काय? जर अंगावर आले तर शिवसेना भवन ही तोडू असा थेट इशारा भाजपचे आमदार प्रसाद लाड (prasad lad) यांनी शिवसेनेला दिला. प्रसाद लाड यांच्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.

भाजप पदाधिकारीच्या कार्यक्रमासाठी प्रसाद लाड माहीममध्ये आले होते. गेल्या महिन्यात शिवसेना भवनावर माहीम येथील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होतं. कार्यकर्त्यांशी बोलत असताना प्रसाद लाड यांनी थेट शिवसेनेला इशाराच दिला.

वेळेपेक्षा अर्धा तास जास्त काम करावं लागलं तरी कंपनीला द्यावा लागणार ओव्हरटाइम

आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर असतील किंवा मी असेल, आता यापुढे जे बालेकिल्ला बालेकिल्ला म्हणत आहे ते पाडण्याचे काम आम्ही करणार आहोत. कारण किल्ले फक्त शिवाजी महाराज यांचे आहे. आता यांचे किल्ले आम्ही पाडणार आहोत, बालेकिल्ला वगैरे काही नाही, असंही लाड म्हणाले.

त्यावेळी जो भाजपचा मतदारसंघ होता, तो अजूनही आपल्यासोबत कायम आहे. आता तर नारायण राणे आणि राणे कुटुंबाला माणणारा मोठा वर्ग भाजपसोबत आला आहे.  त्यामुळे पुढच्यावेळी नितेशजी आपण कार्यकर्ते कमी आणू, कारण आपण आलो की, पोलीसच पुढे येतात. त्यामुळे त्यांना ड्रेसमध्ये येऊ नका असं सांगूया, म्हणजे, ते हॉलमध्ये तरी बसतील. कारण, एवढी त्यांना भीती आहे की, आम्ही माहीममध्ये आलो तर शिवसेना भवन फोडून काढतील. काय घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू,  असं चिथवणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं.

आपल्या विधानामुळे वाद निर्माण झाला हे लक्षात आल्यानंतर प्रसाद लाड यांनी लगेच यू टर्न घेतला. प्रसाद लाड यांनी ट्वीट करून आपल्या विधानाबद्दल सारवासारव केली.

शिवसेनाप्रमुख यांचा आम्ही नेहमी आदर करतो आणि त्यांच शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल आम्ही कधी वाईट बोलण शक्य नाही. प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं प्रसाद लाड म्हणाले.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शवसन #भवन #फड #महणणर #भजपच #आमदर #परसद #लड #यच #यटरन

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

बॉस ऑफर ! Samsung च्या या स्मार्ट टीव्हीवर सगळ्यात मोठा डिस्काउंट, ३ हजारात घरी येईल टीव्ही

नवी दिल्ली:Flipkart Big Bachat Dhamaal Sale: फ्लिपकार्टवर बिग बचत धमाल सेल आज म्हणजे १ जुलैपासून सुरू झाला असून ३ जुलैपर्यंत चालणार आहे ....

तलावाच्या मध्यात बुल्डोजरला लटकून स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, दोरी फिरु लागली आणि… पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. तर येथे आपल्याला स्टंट संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात....

वसंतराव नाईक यांची जयंती; शेती क्षेत्रातील अमूल्य योगदान, कृषी दिनाचा इतिहास काय?

Maharashtra Krushi Day 2022 : राज्यात दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येत असून 1 जुलै...

फडणवीस खरंच नाराज? किरीट सोमय्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्याचं कारण

मुंबई 01 जुलै : 8 ते 10 दिवसांच्या हालचालींनंतर अखेर राज्याच्या राजकारणात गुरुवारी मोठी घडामोड घडली. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर गुरुवारी एकनाथ...