Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या शिवसेना भवनाशी पंगा घेऊन येणारा अजून जन्माला यायचाय; बोला, येताय अंगावर? 'सामना'तून...

शिवसेना भवनाशी पंगा घेऊन येणारा अजून जन्माला यायचाय; बोला, येताय अंगावर? ‘सामना’तून थेट सवाल


मुंबई, 02 ऑगस्ट: भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad)यांनी वेळ आल्यास शिवसेना भवन (Shivsena Bhavan) फोडू, असं वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र (shiv sena mouthpiece saamana) असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, असा थेट इशाराच संजय राऊतांनी प्रसाद लाड यांना दिला आहे.

शिवसेना भवनाकडे ज्यांनी वाकड्या नजरेनं पाहिले ते वरळीच्या गटारात वाहून कायमचे नामशेष झाले, असं आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे. न्याय्य, आशा-आकांक्षांचा आवाज म्हणजे शिवसेना. शिवसेना भवन मराठी माणसांच्या अस्मितेचं प्रतीक, असल्याचं संजय राऊतांनी अग्रलेखात म्हटलं आहे. बोला, येताय अंगावर? असा थेट सवाल ‘सामना’तून भाजपला करण्यात आला आहे.

VIDEO – अरे हिला आवरा! कॅमेरा दिसताच सुरू झाला नवरीचा नखरा

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

मराठी माणसांच्या न्याय्य, आशा-आकांक्षांचा आवाज म्हणजे शिवसेना! शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले (बाटगे) बडबडत आहेत ते त्यांचे पोटाचे जुने दुखणे आहे. असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही. शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच… असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे.

बाटगे आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरून मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही! तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर. पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल. त्यासाठी येताना ‘खांदेकरी’ही घेऊन या. महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना खांद्यावरच जावे लागते, हा इतिहासच आहे.

आता Aadhaar लाही लावता येणार मास्क; जाणून घ्या याचे फायदे, कसं कराल डाउनलोड

कालपर्यंत कुणा दुसऱ्यांच्या बॅगा उचलून गुजराण करीत होते. आज पोटापाण्यासाठी आणखी कुणाचे तरी जोडे उचलत आहेत! असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही. शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच.. असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे.

मराठी माणसांच्या न्याय्य , आशा – आकांक्षांचा आवाज म्हणजे शिवसेना ! शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले ( बाटगे ) बडबडत आहेत ते त्यांचे पोटाचे जुने दुखणे आहे. असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही.

खरेतर या मंडळींची दखल घ्यावी व त्या टिनपाटांवर इथे काही लिहिण्या-बोलण्याची आमची अजिबात इच्छा नाही. पुन्हा हे जे कोणी फोडा- झोडा याची भाषा करीत आहेत त्यांची लायकी फक्त चिंधीचोर दलालांची आहे. शिवसेना भवनाच्या आसपास मैलभर परिघात उभे राहण्याची यांची कुवत नाही. तेजस्वी सूर्यावर थुंकून लक्ष वेधून घेण्यापलीकडे यांचे कर्तृत्व नाही.



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शवसन #भवनश #पग #घऊन #यणर #अजन #जनमल #ययचय #बल #यतय #अगवर #समनतन #थट #सवल

RELATED ARTICLES

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Most Popular

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...

पायांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसली तर सावधान; Cholesterol वाढल्याचे संकेत

ला जाणून घेऊया, कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यावर पायांमध्ये कोणती चिन्हे दिसतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Salman Rushdie stabbed : लेखक रश्दींवर अमेरिकेत चाकूहल्ला, कुमार केतकर म्हणतात…

<p>Salman Rushdie stabbed : लेखक रश्दींवर अमेरिकेत चाकूहल्ला, कुमार केतकर म्हणतात...</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...