Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही; प्रसाद लाड यांच्यावर संजय राऊतांचा...

शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही; प्रसाद लाड यांच्यावर संजय राऊतांचा प्रतिहल्ला, ट्वीट करुन हाणला सणसणीत टोला


मुंबई, 01 ऑगस्ट: वेळ आल्यास शिवसेना भवन (Shivsena Bhavan) फोडू, असं वक्तव्य करणाऱ्या प्रसाद लाड (Prasad Lad)यांच्यावर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. लाड यांच्या वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये संताप आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक आणि बोचरी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यावर मी काय बोलणार. आमचे शाखाप्रमुख उत्तर देतील, असा खोचक टोला संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांना लगावला आहे. रविवारी सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत यांनी प्रसाद लाड यांचा समाचार घेतला. याव्यतिरिक्त संजय राऊतांनी ट्वीट देखील केलं आहे.

राष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड काय म्हणाले

भाजप पदाधिकारीच्या कार्यक्रमासाठी प्रसाद लाड माहिममध्ये आले होते. गेल्या महिन्यात शिवसेना भवनावर माहिम येथील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होतं. कार्यकर्त्यांशी बोलत असताना वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. यावेळी आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते.

आम्ही भाजपच्या कार्यक्रमला आलोय. यांना वाटतंय की शिवसेना भवन तोडायला आले की काय? जर अंगावर आले तर शिवसेना भवन ही तोडू , असं वक्तव्य त्यांनी केलं. आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर असतील किंवा मी असेल, आता यापुढे जे बालेकिल्ला बालेकिल्ला म्हणत आहे ते पाडण्याचे काम आम्ही करणार आहोत. कारण किल्ले फक्त शिवाजी महाराज यांचे आहे. आता यांचे किल्ले आम्ही पाडणार आहोत, बालेकिल्ला वगैरे काही नाही, असंही लाड म्हणाले.

प्रसाद लाड यांच्या विधानावर उदय सामंतांची जोरदार टीका

त्यावेळी जो भाजपचा मतदारसंघ होता, तो अजूनही आपल्यासोबत कायम आहे. आता तर नारायण राणे आणि राणे कुटुंबाला माणणारा मोठा वर्ग भाजपसोबत आला आहे. त्यामुळे पुढच्यावेळी नितेशजी आपण कार्यकर्ते कमी आणू, कारण आपण आलो की, पोलीसच पुढे येतात. त्यामुळे त्यांना ड्रेसमध्ये येऊ नका असं सांगूया, म्हणजे, ते हॉलमध्ये तरी बसतील. कारण, एवढी त्यांना भीती आहे की, आम्ही माहीममध्ये आलो तर शिवसेना भवन फोडून काढतील. काय घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू, असं चिथवणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शवसन #भवनचय #फटपथवर #बदम #चपलयशवय #रहणर #नह #परसद #लड #यचयवर #सजय #रऊतच #परतहलल #टवट #करन #हणल #सणसणत #टल

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

फेसबुक, इंस्टाग्रामनंतर आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार अवतार फिचर, जाणून घ्या

मुंबई, 29 जून: इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे. सकाळी उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत आपण आपला जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर घालवतो. यातही आपला बहुतांश...

Marathwada: मराठवाड्यात आतापर्यंत 137 मिलिमीटर पाऊस; गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच

Marathwada Rain Update: मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदर हजेरी लावली असून, मागील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी...

Mouth Ulcers : तुम्ही देखील तोंड येण्याच्या समस्येनं त्रस्त आहात? मग ‘हा’ उपाय नक्की करुन पाहा

तसे पाहाता अल्सर येणं हे नॉर्मल असलं तरी यावर वेळेवर उपचार न केल्यास ते कर्करोगाचेही कारण बनू शकते. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

5G Smartphones: नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याआधी ही लिस्ट एकदा पाहाच, सुरुवातीची किंमत ८,९९९ रुपये

नवी दिल्ली: Budget 5G Smartphone: जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि बजेट कमी असेल तर, आज आम्ही तुम्हाला १५ हजारांखालील टॉप ५...

माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका, आरेच्या निर्णयाचं दु:ख : उद्धव ठाकरे

Uddhav Thackrey : माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव...