Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या 'शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे!' फेसबुक पोस्ट करत भाजप पदाधिकाऱ्यांकडून डिवचण्याचा प्रयत्न

‘शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे!’ फेसबुक पोस्ट करत भाजप पदाधिकाऱ्यांकडून डिवचण्याचा प्रयत्न


Maharashtra Political Crisis :   शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठका झाल्या. मात्र अजून या राजकीय पटावर भाजपची म्हणावी अशी एन्ट्री झालेली नाही. यात एका भाजप पदाधिकाऱ्याची फेसबुक पोस्ट मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. 

भाजप मुंबई महिला मोर्चाच्या शीतल गंभीर देसाई यांनी फेसबुक पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांचा शिवसेना प्रमुख म्हणून उल्लेख केला आहे. या पोस्टवर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला जात आहे. यावर शिवसेना कार्यकर्त्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. शीतल गंभीर देसाई या माहिमच्या नगरसेविका आहेत. त्या भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून अद्याप काही प्रतिक्रिया आलेली नाही. 

शीतल गंभीर देसाई यांनी फेसबुकवर एक ग्राफिक्स शेअर केलंय. त्यामध्ये शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन असा मजकूर लिहिला आहे. यावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

शिवसेनेतील बंडाळीनंतर भाजपकडून अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह सूरत तसेच गुवाहाटीमध्ये देखील भाजपचे पदाधिकारी दिसून आले आहेत. भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचं देखील माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याची अट उद्धव ठाकरेंसमोर ठेवली होती. या बंडानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 37 आमदारांसह एकूण 46 आमदार असल्याचं बोललं जात आहे. तर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे. शिवसेनेने 12 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव ठाकरे यांचे विभागप्रमुखांना आदेश

Maharashtra Political crisis : 12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करा, शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी

Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : राज्यातील सत्तासंघर्षाचा चौथा दिवस, अपडेट्स एका क्लिकवर..अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शवसन #परमख #एकनथ #शद #फसबक #पसट #करत #भजप #पदधकऱयकडन #डवचणयच #परयतन

RELATED ARTICLES

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

Most Popular

टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा; नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

नवी दिल्ली, 1 जुलै : प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकारले आहे. तुमच्या वक्तव्याने देशातील वातावरण...

‘हा तर आश्चर्याचा धक्का’, शरद पवारांनी फडणवीसांना डिवचलं

मुंबई, 30 जून : भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी शक्यता होती. पण त्यांनी दुपारी घेतलेल्या...

मोबाईल-लॅपटॉपचा अतिरेक झालाय; गंभीर आजार टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

मुंबई, 01 जुलै : सध्या प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन आणि लॅपटॉप वापरत आहे. फोन आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे डोळ्यांव्यतिरिक्त आरोग्याची अनेक प्रकारे हानी होत...

Flipkart Sale ला सुरुवात, चक्क अर्ध्या किंमतीत मिळतोय ४३ इंच स्मार्ट टीव्ही; पाहा ऑफर

नवी दिल्ली :Flipkart Big Bachat Dhamaal Sale: ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर आजपासून बिग बचत धमाल सेल (Flipkart Big Bachat Dhamaal Sale) सुरू झाला...

राज्यात शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

मुंबई :  राज्यात आज 3249 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 4189  रुग्ण कोरोनामुक्त...

Flipkart Sale July 2022 : शॉपिंग करण्याची “हीच ती वेळ”

मुंबई : आज पासून 3 दिवस Flipkart Big Bachat Dhamaal Sale July 2022 सुरू होतोय. या बिग बचत धमाल सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि...