शिवसेना भवन फोडू असं वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्यांनी त्या वक्तव्यावरुन घुमजाव केला. आपण असं कोणतंही वक्तव्य केलेलं नसून माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असल्याचं प्रसाद लाड म्हणाले आहेत.
आपल्या विधानामुळे कुणाचं मन दुखावलं असेल, तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, असं प्रसाद लाड म्हणालेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन त्यांनी दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रसाद लाड यांचं स्पष्टीकरण
प्रसारमाध्यमांतून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करून मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या दिसत आहेत. पण मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल, असं ते व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.
ज्या शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. शिवसेना प्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल माझ्याकडून तरी असं कोणतंही वक्तव्य केलं जाणार नाही, असं प्रसाद लाड आपल्या स्पष्टीकरणाच्या व्हिडिओत म्हणाले.
प्रसाद लाड यांच्या विधानावर उदय सामंतांची जोरदार टीका
माझं असं म्हणणं होतं की, आम्ही माहीममध्ये जेव्हा येतो. तेव्हा एवढा बंदोबस्त ठेवला जातो, की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत, असं प्रसाद लाड यांनी आपल्याला नेमकं काय बोलायचं होतं याचा दावा व्हिडिओत केला आहे.
त्या वक्तव्याचा विपर्यास करून जे काही दाखवण्यात आलं आहे, त्यावर माझं हे स्पष्टीकरण आहे. मला कोणत्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अखेर व्यक्त केली दिलगिरी
जर मी कुणाचं मन दुखावलं असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असं प्रसाद लाड म्हणालेत.
जगभरातल्या कोट्यवधी गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी
शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमीच आदर करतो आणि त्याच शिवसेनाप्रमुखांच्या सेना भवनाबद्दल आम्ही कधी वाईट बोलण शक्य नाही! प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला..!, असं कॅप्शन त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओला दिलं आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#शवसन #परमखचय #सन #भवनबददल #आमह #कध #वईट #बलण #शकय #नह #परसद #लड #यचयकडन #दलगर #वयकत