Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या शिवसेना नेते यशवंत जाधव यांचा पाय आणखी खोलात?; आयकर खात्याच्या तपासात नवीन...

शिवसेना नेते यशवंत जाधव यांचा पाय आणखी खोलात?; आयकर खात्याच्या तपासात नवीन बाबी उघड


Yashwant Jadhav : शिवसेना नेते यशंवत जाधव यांचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. आयकर विभाग करत असलेल्या तपासात अनेक गोष्टींचा खुलासा झाला असून काही नवीन धागेदोरे तपासात आढळून आले आहेत. मागील 10 दिवसात यशवंत जाधव यांच्याविरुद्धच्या तपासाला वेग आला आहे. यशवंत जाधव यांनी काही ज्वेलर्सकडून 6 कोटींचे दागिने रोख रक्कम मोजून खरेदी केले असल्याचे समोर आले आहे. 

शिवसेनेचे मुंबईतील महत्त्वाचे नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या घरावर काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने छापा मारला होता. जानेवारी महिन्यात भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. त्यानंतर आयकर खात्याने जाधव यांच्या घरावर छापा मारला होता. त्यानंतर यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला होता.  

रोख रक्कम देऊन 6 कोटींच्या दागिन्याची खरेदी 

यशवंत जाधव प्रकरणात आयकर खात्याच्या चौकशीत आणखी काही बाबी उघड झाल्या आहेत. गेल्या 10 दिवसांत तपासाला वेग आला आहे. जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता 53 वर पोहचली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही इमारत खरेदी करण्यात आली. या एकट्या इमारतीतून 80 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार उघडकीस आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
गेल्या 10 दिवसांत आयकर खात्याने प्रत्यक्ष ठिकाणांवर जाऊन स्पॉट तपास करत खातरजमा केली आहे. या चौकशी दरम्यान काही व्यक्तींनी शपथेवर कबुलीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  यशवंत जाधव यांनी
काही ज्वेलर्सकडून 6 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केली. ही खरेदी संपूर्ण रक्कम रोखीने करण्यात आली. यामध्ये एका मध्यास्थामार्फत 1.77 कोटींच्या दागिन्यांची खरेदी करण्यात आली होती. या व्यवहारातही रोखीने पैसे स्वीकारल्याची कबुली या संबंधित ज्वेलर्सने दिली आहे. 

त्याशिवाय बिलाकाडी चेंबर्समध्ये 3 खोल्यांचे टेनन्सी राईटस खरेदी करण्यासाठी यशवंत जाधव यांनी 1.15 कोटी रुपये रोखीने दिल्याचेही तपासात उघड झाले आहे.  कोरोनेशन बिल्डींग, झैनाब महाल आणि कैसर बिल्डींगमध्ये अचल संपत्ती हस्तांतरणासाठी 3 कोटींहून अधिक रक्कम रोखीने देण्यात आली असल्याचे समोर आले असून आणखी रोख रकमेच्या व्यवहारांचा तपास सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शवसन #नत #यशवत #जधव #यच #पय #आणख #खलत #आयकर #खतयचय #तपसत #नवन #बब #उघड

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

Most Popular

पाकिस्तानात पैसे आणि पेट्रोल संपले! माजी क्रिकेटपटूनं सांगितलं जगाला सत्य

मुंबई, 26 मे : भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेत गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक टंचाई आहे. या आर्थिक टंचाईमुळे देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे....

तब्बल 141 दिवस शनि महाराजांची आहे उलटी चाल; या राशीच्या लोकांनी काळजी घ्या

मुंबई, 26 मे : शनीची उलटी चाल कुंभ राशीत सुरू होणार आहे. 05 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री (Shani Vakri) होईल. रविवार,...

Todays Headline 26th May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये...

Airtel: अवघ्या १४९ रुपयात घ्या १५ ओटीटी आणि १०,५०० चित्रपटांचा आनंद; पाहा ‘हा’ शानदार प्लान

नवी दिल्ली :Airtel Xstream Premium: Netflix, Amazon Prime Video आणि इतर प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी शेकडो रुपये खर्च करावे लागतात. परंतु, या सर्व प्लॅटफॉर्म्सचा...

अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आक्रमक अंदाज; ‘वाय’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

मुंबई, 26 मे:  अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) नेहमीच नवीन चांगल्या आशयाचे आणि विषयाचे चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आजवर अनेक भूमिकांमध्ये आपण...

रजत ठरला गोल्ड… आरसीबीचा विजयासह Qualifier-2मध्ये दणक्यात प्रवेश, लखनौचा खेळ खल्लास

कोलकाता : रजत पाटीदारचे धडाकेबाज शतक आणि त्याला मिळालेली गोलंदाजांची सुरेख साथ यावेळी आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सवर १४ धावांनी विजय साकारला आणि क्वालिफायर-२मध्ये...