Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या शिवसेना खासदार संजय राऊत राहुल गांधींच्या भेटीला, दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास...

शिवसेना खासदार संजय राऊत राहुल गांधींच्या भेटीला, दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा


नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. महाविकास आघाडीमधील कुरबुरीची चर्चा सुरू असताना ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. 12 तुगलक लेन या राहुल गांधींच्या निवासस्थानी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यामध्ये जवळपास सव्वा तास बैठक झाली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संजय राऊत आणि राहुल गांधी यांची पहिलीच वन-टू-वन बैठक होती. 

संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं की, राहुल गांधी यांच्याशी आज  भेट झाली. राहुल गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धतीबाबत त्यांनी जाणून घेतले.

गेल्या काही दिवसात राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये मतभेद झाल्याचे दिसून आलं होतं. खासकरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राज्यातील या घडामोडींनंतर आजची राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

Rahul Gandhi-Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत राहुल  गांधींच्या भेटीला, दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा

संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज शिवसेना खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेतली. महाराष्ट्रातल्या महापुराच्या संकटात विमा कंपन्यांनी व्यापाऱ्यांचा छळ थांबवावा. राज्याच्या मदतीसाठी केंद्राने तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेनेचे संसदीय पक्षनेते संजय राऊत, लोकसभेतले गटनेते विनायक राऊत, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, यांच्यासह इतर खासदार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, फौजिया खान देखील यावेळी उपस्थित होते. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शवसन #खसदर #सजय #रऊत #रहल #गधचय #भटल #दनह #नतयमधय #सवव #तस #चरच

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

Coronavirus : देशात नवे 18053 कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजारांवर

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना...

पालक आणि मुलांच्या नात्यात ‘या’ 5 गोष्टीमुळे पसरते विष

Clues a Relationship With a Parent Is Toxic : प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसोबत एक खास नातं हवं असतं. त्यासाठी ते प्रयत्नशील देखील असतात....

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगच्या अडचणी वाढल्या, पोलिसांनी पाठवली नोटीस

मुंबई : एका मासिकासाठी नग्नावस्थेत फोटोशूट करणं बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला...

मुंबईत शुक्रवारी 871 रुग्णांची नोंद, 445 कोरोनामुक्त

Mumbai Corona Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या...

वसुली एजंट्स तुम्हाला धमकावतात? अवेळी कॉल करतात?…वाचा RBI ची नवी नियमावली काय सांगते

मुंबई: बँकांकडून देण्यात आलेल्या कर्जाची वसुली करताना वसुली एजंट्सकडून (Recovery Agents) अनेकदा कर्जदारांना त्रास दिला जातोय, अपशब्द वापरले...

 Nashik News : नाशिक शहरात थांबवण्यात आली राष्ट्रध्वजांची विक्री, सव्वा लाख राष्ट्रध्वज सदोष

Nashik News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या (Swatantrya Amrut Mahotsav) निमित्ताने हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) उपक्रमांतर्गत नाशिक...