Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदे 'धनुष्यबाणावर' दावा करु शकतात का? घटना काय सांगते....

शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदे ‘धनुष्यबाणावर’ दावा करु शकतात का? घटना काय सांगते….


Maharashtra Political Crisis Eknath Shinde Shiv Sena : बंडाचं निशाण फडकावल्यानंतर एकनाथ शिंदेंकडे जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढतानाच दिसत आहे. आज आणखी काही आमदार शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. शिंदे यांच्यासोबत सध्या 40 च्या वर आमदारांची संख्या आहे. हे सगळं सुरु असताना ‘मूळ पक्ष’ म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदेंच्या गोटात असल्याची माहिती समोर येत आहे. ‘मूळ पक्ष’ म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदेंचे प्रयत्न आहेत, अशी माहिती आहे. यासाठी भाजपची टीम मदत करत असल्याची देखील माहिती आहे. आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पत्र सादर केल्यानंतर शिंदे सत्तास्थापनेचा दावा करतील अशी माहिती मिळतेय.

मूळ पक्षावर दावा करण्यासाठी काय आवश्यक

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी सांगितलं की, विधिमंडळात पक्षात फूट पडण्यासाठी दोन तृतीअंश आमदार त्या गटाकडे असणं आवश्यक असतं. तसं मूळ पक्षावर दावा करण्यासाठी त्यांच्या पॅरेन्ट्स पार्टीमध्ये फुट पडायला हवी. यामध्ये ऑफिस बेरर, पक्षाचे प्रतिनिधी, लोक प्रतिनिधी यामध्ये फुट झाली असेल तर त्या पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह तुम्हाला मिळू शकतं. यामध्ये रवी नायक केसमध्ये सुप्रीम कोर्टानं बाबी स्पष्ट केल्या आहेत. फक्त विधिमंडळ पक्षात नाही तर मूळ पक्षात फुट पडायला हवी तरच पक्षाच्या अधिकृत नावावर आणि चिन्हावर दावा करता येऊ शकतो. 

ही फुट पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडे मूळ पक्ष आमचा आहे याच्यासाठी जावं लागतं. त्यावर आयोग काय देतो त्यावर न्यायालयात लढाई जाऊ शकते. ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे. पक्षाचं अधिकृत चिन्ह आणि नाव हवं असेल तर ऑफिस बेरर, पक्षाचे प्रतिनिधी, लोक प्रतिनिधीबाबत दोन तृतीअंशचा कोटा पूर्ण करावा लागेल. हे नाही झालं तर मूळ गट कितीही छोटा असला आणि बाहेर पडलेला गट कितीही मोठा असला तरी पक्षाचं नाव आणि चिन्हं मूळ गटाकडेच राहतं. 

काय आहे कायदेशीर प्रक्रिया? घटनेत नेमकं काय
ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट म्हणाले की, किती सभासद आहेत हे आधी सिद्ध करावं लागेल. आता तरी एकनाथ शिंदे यांच्या गटाला कुठलाही कायदेशीर आधार नाही. त्यांना आधी इथं येऊन 37 सदस्य त्यांच्याकडे आहेत हे सिद्ध करावं लागेल. आता जो शिवसेना पक्ष आहे तोच शिवसेना आहे. या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. हे जर तिथं अपात्र ठरले तर विषयच संपतो. जर 37 लोकं आले तर त्यांना चिन्ह मिळवावं लागेल. मग खरी लढाई चालू होईल. राष्ट्रपती राजवट लावायची का नाही? मुख्यमंत्री कोण होणार? यात काही भांडणं झाली तर मात्र सुप्रीम कोर्टाकडे निर्णय जाईल, असं उल्हास बापट म्हणाले.  

इतर महत्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची तयारी मागील 6 महिन्यांपासून, गृहखात्याकडून मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतरही दुर्लक्ष : सूत्र 

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्र्यांची भावनिक साद, शिंदे मात्र ठाम; राज्यात सत्ता पेच, दोन दिवसांत काय-काय घडलं?

राजकीय संकट घोंघावतंय…SID कडून सरकारला दोन महिन्यांपूर्वीच बंडखोरीची कल्पनाअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शवसन #कणच #एकनथ #शद #धनषयबणवर #दव #कर #शकतत #क #घटन #कय #सगत

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...