मात्र ही प्रक्रिया इतकी सोपी नाही. याबाबत तक्रार केल्यानंतर प्रत्येक आमदाराला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात येईल. या प्रकरणात आमदाराच्या वागणुकीकडेही लक्ष दिलं जाईल. सर्व पुरावे पाहिल्यानंतर अध्यक्ष यावर निर्णय घेतली, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.
या नेत्यांची आमदारकी रद्द करा – शिवसेना
एकनाथ शिंदे
अब्दुल सत्तार
यामिनी जाधव
संजय शिरसाठ
बालाजी किणीकर
तानाजी सावंत
संदिपाम भुमरे
भारत गोगावले
लता सोनावणे
अनिल बाबर
महेश शिंदे
प्रकाश सुर्वे
आताची राजकीय अपडेट..
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. शिवसेनेविरोधात बंड पुकारुन गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना परिणाम भोगावे लागतील, असं विधान शरद पवारांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंडखोर आमदारांमागे भाजपचा हात नाही, असं विधान केलं आहे. या सर्व घटनेनंतर नारायण राणे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे धमकी देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि शेवटी स्वत:च पवारांना धमकी दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल.
तुमच्या शहरातून (मुंबई)
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#शवसनह #अकशन #मडमधय #एकनथ #शदन #थट #परतयततर #आमदरवर #करवई