Friday, August 12, 2022
Home मुख्य बातम्या शिंदे सरकारवर कोण होईल वरचढ? विरोधी पक्षनेतेपदासाठी 4 नावांची जोरदार चर्चा

शिंदे सरकारवर कोण होईल वरचढ? विरोधी पक्षनेतेपदासाठी 4 नावांची जोरदार चर्चा


मुंबई, 3 जुलै : महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पहिला पेपर तर सोडवला आहे. रविवारी महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Maharashtra Assembly Speaker) पार पडली, त्यात शिंदे गटाचे भाजप उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) विजयी झाले. सोमवारी बहुमत चाचणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपली ताकद सिद्ध करायची आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ असल्याचे पाहायला मिळत आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांमध्ये चार नावं आघाडीवर..
आघाडीमधील तीन्ही पक्षांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्याबळ जास्त असल्याने विरोधी पक्षनेता त्यांचाच असणार आहे. राष्ट्रवादीमध्ये या पदासाठी 4 नावावर जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे या नावांचा समावेश आहे. दरम्यान, अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज अजित पवार यांच्या नावावर होणार शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज बैठकीत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Assembly Speaker Election : शिवसेना Vs एकनाथ शिंदे गटाचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाण्याची शक्यता

राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड
एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी बोलावलेले विशेष अधिवेशन सुरू झाले. आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. सुरुवातील शीरगणती करण्यात आली . शिंदे आणि भाजपच्या बाजूने बसलेल्या आमदारांची संख्या ही बहुमताचा आकडा पार केला. राहुल नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं मिळाली त्यामुळे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर मविआचे उमेदवार राजन साळवी यांच्याविरोधात 107 मतं मिळाली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. आधी ते शिवसेनेत होते, आता भाजपमध्ये आहेत, त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही होते. त्यामुळे या सर्व पक्षांना अभिप्रेत असलेल्या भूमिकांची त्यांना उत्तम जाण आहे. पक्षाची हीच भूमिका प्रवक्ते म्हणून मांडताना त्यांनी वेळोवेळी आपल्यातील हे गुण दाखवून दिलेले आहेत. त्यामुळे कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तुमच्या शहरातून (मुंबई)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शद #सरकरवर #कण #हईल #वरचढ #वरध #पकषनतपदसठ #नवच #जरदर #चरच

RELATED ARTICLES

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

Udayanraje Bhosale : प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा...

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

Most Popular

पुढील देशांतर्गत हंगामात अर्जुन गोव्याकडून खेळणार?; मुंबईकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुढील देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. २२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज...

तांदळाचे दरही आता वाढणार?; भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट

वृत्तसंस्था, नवी दिल्लीमहागाईपाठोपाठ देशात तांदूळटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. चालू खरीप हंगामात पाच ऑगस्टपर्यंत देशातील भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट झाली असून, कमी...

PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल.

PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल... अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट, जलस्रोतांवर मोठा परिणाम, थेम्स नदीचे पात्रही कोरडे

Thames River : जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट (Heat...

सांगलीत पुराचा धोका! कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना

Sangli Flood:संततधार पावसामुळेकृष्णा नदीच्या (Sangli Krushna River) पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोबतच आज कोयनेतून विसर्ग (Koyna Dam)वाढवण्यात येणार...

‘लाल सिंह चड्ढा’च्या तुलनेत ‘रक्षा बंधन’ पडला मागे! पाहा पहिल्या दिवसाचे कलेक्शन…

Raksha Bandhan Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षा बंधन’...