एकनाथ शिंदे सरकारमध्ये आता खातेवाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महसूल मंत्रिपदावरून भाजपमध्ये खलबत सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना महसूल खाते हवे आहे. पण महसूल खाते कुणाला द्यावे यावरून भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. याआधीही महसूल खाते हे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच होते. याहीही वेळी चंद्रकांत पाटील हे महसूल खात्यासाठी तयारी करत आहे.
पुढच्या आठवड्यात इतर मंत्र्यांना शपथ देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गट आणि भाजपातील नेते पुढच्या आठवड्यात मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाच तारखेनंतर इतर मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पाच मंत्री कोण आहे अशी चर्चा रंगली आहे.
(कोल्हापूर : बंद कंटेनरला कारची तर अपघातग्रस्त कारला ट्रकची धडक, चौघांचा मृत्यू)
दरम्यान, शिवसेना फोडून बाहेर पडलेल्या 40 हून अधिक आमदारांची मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसेना फोडून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता आमदारांच्या अपेक्षाही वाढल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बच्चू कडू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. आतापर्यंत बच्चू कडू यांच्याजवळ राज्यमंत्रिपद होतं. मात्र आता कॅबिनेट मंत्रिपद मिळावं आणि मोठा विभागा असावा अशी मागणी केल्याची चर्चा आहे. जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास यांसारखी मोठं मंत्रिपद त्यांना मिळावं अशी बच्चू कडूंची मागणी आहे.
(शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद तडकाफडकी बरखास्त)
दुसरीकडे शिंदेंच्या गटातील संजय शिरसाटही नाराज असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाला आहे. एका जिल्ह्यात दोन मंत्रिपद दिलं जात असल्यानं शिरसाट नाराज झाले आहे. यापुढेही अशी नाराजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेची खरी अग्निपरीक्षा आता सुरू होत आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
तुमच्या शहरातून (मुंबई)
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#शद #सरकरमधल #जणच #पढल #आठवडयत #शपथवध #चदरकतददन #हव #महसल #खत