Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या शिंदे गटात आमदार का चाललेत? हे लवकरच समजेल; संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

शिंदे गटात आमदार का चाललेत? हे लवकरच समजेल; संजय राऊतांचं सूचक वक्तव्य


Shivsena MP Sanjay Raut on Maharashtra Political Crises : जे आमदार सोडून गेले ती खरी शिवसेना नाही, तर काल वर्षा निवासस्थान सोडून मुख्यमंत्री मातोश्रीवर जात असताना जे रस्त्यावर जे कार्यकर्ते होते, तो खरा शिवसेना पक्ष, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. जे आमदार गुवाहाटीला (Guwahati) गेले आहेत, त्यातले 18 ते 20 आमदार अजूनही आमच्या संपर्कात असल्याचा दावाही यावेळी राऊतांनी केला. आज दोन आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत. ते तुम्हाला सगळी कहाणी सांगतील असंही राऊतांनी सांगितलं आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, “ईडीच्या किंवा इतर काही अमिषांना बळी पडून जर आमदार काही पळाले असतील, विशेषतः ते स्वतःला बछडे आणि वाघ वैगरे म्हणून घ्यायचे, तर ते म्हणजे पक्ष नाही. आपण जो काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे. हा पक्ष अद्याप मजबूत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली उभा आहे. 4 आमदार, अजून कोणी दोन खासदार, दोन नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही होत. हे का गेलेत सोडून, याची कारण लवकरच समोर येतील.” 

“सोडून गेलेल्या काही आमदारांशी आमच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्यातील काहीजण अद्यापही आमच्या संपर्कात आहेत. ते सांगतात, आम्हाला कसं जबरदस्तीनं नेलंय तिकडे. आज आमच्या दोन आमदारांची पत्रकार परिषद आहे. नितीन देशमुख आणि कैसाल पाटील तुम्हाला सगळी कथा सांगतील. अशाप्रकारे किमान 17 ते 18 आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत.” असं संजय राऊत म्हणाले. मी भारतीय जनता पक्ष हाच शब्द वापरतोय. कारण त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजपशासित राज्यात अशाप्रकारे आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही, असा घणाघाती आरोपही संजय राऊतांनी भाजपवर केला आहे. 

आज मुख्यमंत्री कोणतीही बैठक घेणार नसून वर्षावर काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी ते जाणार आहेत. त्यानंतर आमचे दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख पत्रकार परिषद घेतील. यावेळी पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित असतील. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना कोणतंही आवाहन केलेलं नाही. या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं एवढंच सांगायचं आहे.”, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 

“आजही आमचा पक्ष मजबूत आहे. उद्धव ठाकरे वर्षावरुन मातोश्रीला जात असताना रस्त्यावर जे चित्र होतं ती शिवसेना आहे.”, असं राऊतांनी सांगितलं. 

“20 आमदार आमच्या संपर्कात असून ते मुंबईत आल्यानंतर खुलासा होईल. माझ्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता तुम्हाला दिसणार नाही. आम्हाला अशा परिस्थितीचा अनुभव आहे. आपण बाळासाहेबांचे भक्त आहोत इतकं म्हणणं पुरेसं नाही. दबावाला बळी पडून जर कोणी पक्ष सोडत असेल तर तो बाळासाहेबांचा भक्त असू शकत नाही. आमच्यावरही दबाव आहे. आमचा एक मंत्री चार दिवस ईडीच्या कार्यालयात जाऊन बसतोय, पण त्यानं पक्ष सोडला नाही. मी आणि माझ्या कुटुंबावरही ईडीचा दबाव आहे. पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे कुटुंबासोबत राहणार”, असं संजय राऊत म्हणाले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शद #गटत #आमदर #क #चललत #ह #लवकरच #समजल #सजय #रऊतच #सचक #वकतवय

RELATED ARTICLES

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं शक्तिप्रदर्शन, पंतप्रधानही येणार

मुंबई, 2 जुलै : भारतीय जनता पक्षानं (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण भारतामधील राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या याच तयारीचा भाग म्हणून...

sacred games actress kubra sait got pregnant after one night stand | वन नाइट स्टँड, प्रेग्नंसी आणि गर्भपात; ‘सेक्रेड गेम्स’ फेम कुब्रा सैतचा धक्कादायक...

वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ अभिनेत्री कुब्रा सैतचं पुस्तक ‘ओपन बुकः नॉट क्वाइट ए मेमॉयर’ अलिकडेच लॉन्च झालं. या पुस्तकात तिने तिच्या आयुष्यातील अनेक...

तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना कामावरून का काढलं? Byju’s नं अखेर सांगितलं मोठं कारण

मुंबई, 01 जुलै: 27 जून रोजी संध्याकाळी बायजूस कंपनीनं (Byjus Company) त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यवस्थापक आणि एचआरचे फोन...

Todays Headline 2nd July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

‘मराठा म्हणून एकनाथ शिंदे..’; ज्योतिरादित्य शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत

नवी दिल्ली 02 जुलै : राज्यातील राजकारणात मागील जवळपास १० दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत होत्या. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेना आणि अपक्ष...

पंतच्या शतकाने इंग्लंडचा अहंकार मोडला आणि जागा झाला ‘इंद्रानगरचा गुंड’

बर्मिंगहॅम: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने १०० धावांपर्यंत ५ विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर ऋषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या समाचार घेतला....