Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या शिंदेंच्या बंडखोरीची तयारी 6 महिन्यांपासून,मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतरही दुर्लक्ष:सूत्र

शिंदेंच्या बंडखोरीची तयारी 6 महिन्यांपासून,मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतरही दुर्लक्ष:सूत्र


Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याची तयारी मागील 6 महिन्यांपासून सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाच ते सहा वेळा गृहखात्याकडून शिंदे यांच्या भाजप नेत्यांशी वाढत्या भेटींबाबत आणि संशयास्पद हालचालींची माहिती देण्यात आली होती, अशी देखील माहिती आहे. इंटेलिजन्सचां रिपोर्ट मिळून देखील मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून ‘एबीपी माझा’ला मिळाली आहे. 

काल अशी देखील माहिती समोर आली होती की,  एकनाथ शिंदेंच्या बंडाळी प्रकरणी शरद पवार Intelligence Department वर नाराज आहेत. पोलिसांना याबाबत कुणकुणही लागली नाही, याबाबत पवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती काल समोर आली होती. 

राज्य गुप्तचर विभागानेही दिली होती माहिती

काल अशी देखील माहिती समोर आली होती की, राज्य गुप्तचर विभागाने अर्थात एसआयडीने महाराष्ट्रातील राजकीय संकटाची कल्पना दोन महिन्यांपूर्वीच सरकारला दिली होती. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावा महाराष्ट्र पोलिसांच्या सूत्रांनी केला होता. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह आठ ते दहा आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात होते, अशी गोपनीय माहिती एसआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दिली होती. 

राज्यातील संभाव्य घडामोडींवर लक्ष ठेवणे, राजकीय घडामोडी आणि हालचाली, गुन्हे तसेच समाजकंटक, दहशतवादी आणि माओवादी कारवायाबद्दल आगाऊ सूचना देणे हे एसआयडीचं काम आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी राज्य गुप्तचर विभागाची स्थापना केली. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार राजकीय घडामोडींची माहिती अनेकदा सरकारला तोंडी दिली जाते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा अंदाज घेण्यात शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकार अयशस्वी ठरलं आहे.

एसआयडीने देखील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची पूर्वकल्पना दिली होती. अशा परिस्थितीत एसआयडीच्या मदतीने काहीतरी पावलं उचलायला हवी होती. अनेक वेळा राजकारण्यांचे विशेष सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त केलेल्या पोलीस अधिकार्‍यांकडून राज्य पोलिसांना गुप्तचर माहिती देखील मिळते, असं सूत्रांनी सांगितलं.

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्र्यांची भावनिक साद, शिंदे मात्र ठाम; राज्यात सत्ता पेच, दोन दिवसांत काय-काय घडलं?

राजकीय संकट घोंघावतंय…SID कडून सरकारला दोन महिन्यांपूर्वीच बंडखोरीची कल्पनाअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शदचय #बडखरच #तयर #महनयपसनमखयमतरयन #महत #दलयनतरह #दरलकषसतर

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Most Popular

‘भगतसिंग यांच्या फाशीवेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला, तसा राज्यपालांना…’

मुंबई 04 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर ठाकरे सरकार (Thackeray...

Liger : ‘लायगर’च्या पोस्टरचा विक्रम! प्रदर्शित होताच झाले सोशल मीडियावर ट्रेंड!

Liger : करण जोहरचा आगामी चित्रपट ‘लायगर’ (Liger) रिलीज पूर्वीच चर्चेत आला आहे. नुकतेच या चित्रपटातील विजय देवरकोंडाचा...

वजन कमी करण्यासाठी अशा पद्धतीने खा खसखस, होईल जास्त फायदा

मुंबई, 04 जुलै : जेवणात मसाल्याच्या भाज्यांमध्ये आपण खसखस (Poppy Seeds) वापरतो. पण तुम्ही कधी वजन कमी करण्यासाठी खसखस (Poppy Seeds For Weight...

Femina Miss India Winner: ‘या’ सौंदर्यवतीच्या नावे ‘मिस इंडिया’चा किताब; जाणून घ्या तिचं नाव, गाव

Femina Miss India Winner: सौंदर्यस्पर्धांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या Femina Miss India च्या अंतिम फेरीमध्ये कर्नाटकच्या सिनी शेट्टी (Sini Shettyy) हिला विजेतेपद मिळालं. सिनीला...

…त्यावेळी ब्रिटीशांना जसा आनंद झाला तसा मविआची सत्ता गेल्यावर राज्यपालांना झालाय : शिवसेना

Saamana Shiv Sena Article : काल शिंदे-फडणवीस सरकारच्या अग्निपरीक्षेच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली....

आज पंजाबमध्ये मान सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार, ‘या’ नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी

Punjab Cabinet : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या मान सरकारल आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळं आज पंजाबमध्ये...