Saturday, May 21, 2022
Home विश्व शास्त्रज्ञांना मोठे यश, चंद्रावरुन आणलेल्या मातीत रोप उगवले, पाहा कसे ते?

शास्त्रज्ञांना मोठे यश, चंद्रावरुन आणलेल्या मातीत रोप उगवले, पाहा कसे ते?


वॉशिंग्टन : Moon Soil : चंद्रावर वस्ती करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. प्राणी आणि माणूस चंद्रावर गेलेत. तेथील वातावरण आणि मातीचा अभ्यास केला गेला. आता चंद्रावरुन आणलेल्या मातीतून पृथ्वीवर बाग फुलविण्यात यश आले आहे. यात  शास्त्रज्ञांचा मोठा वाटा आहे. थक्क करणाऱ्या या प्रयोगाचीच चर्चा होत आहे. (Scientists Successfully Grow Plants In Moon Soil For First Time)

‘अपोलो’ मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांनी पृथ्वीवर चंद्रावरुन माती आणली. या मातीत बाग फुलविण्याचा प्रयोग करण्यात आला. यात शास्रज्ञांना यश आले. चंद्रावरील मातीत शास्त्रज्ञांनी प्रथमच रोपे उगवली आहेत. चंद्रावर किंवा भविष्यातील अंतराळ मोहिमेदरम्यान अन्न आणि ऑक्सिजन तयार करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे 
मोठे पाऊल मानले जात आहे. आता मानवाला चंद्रावर पुन्हा पाठवण्याच्या ‘नासा’च्या ‘आर्टेमिस प्रोग्राम’अंतर्गत हे संशोधन करण्यात आले आहे.

मातीसाठी चंद्रायान मोहीम

अमेरिकी अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘अपोलो’ 11,  12 आणि  17 व्या मोहिमेदरम्यान चंद्राच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून ही माती आणली. संशोधकांनी या मातीत बिया पेरल्या. त्यांना पाणी, पोषक तत्त्वे आणि प्रकाश दिला आणि होणाऱ्या बदलाची नोंद ठेवली. 

चंद्रावरच्या मातीला रेगोलिथ असे म्हटले जाते. मातीचे चार वेगवेगळ्या भागात विभाजन करुन त्यात पाणी आणि पोषक घटक असलेले द्रव्य शास्त्रज्ञानी मिसळले. यानंतर त्यात अर्बिडोप्सिसच्या बिया पेरल्या. काही दिवसातच कुंडीत लहान रोपटे उगवले. रोपाविषयीची सविस्तर माहिती ‘जर्नल ऑफ कम्युनिकेशन्स  बायोलॉजी’ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी अगदी 12 ग्रॅम मातीत हा यशस्वी प्रयोग केला आहे. चंद्रावरील माती ही पृथ्वीवरील मातीपेक्षा वेगळी असल्याने रोपे तिला जैविकदृष्ट्या कसा प्रतिसाद देतात, याचाही अभ्यास करण्यात आला. 

चंद्राच्या मातीत अशी बाग फुलली

चंद्रावरुन आणलेल्या मातीत शास्त्रज्ञानी सामान्यत: पेशींच्या संवर्धनासाठी वापरल्या जाणाऱ्या अंगठ्याच्या आकाराच्या प्लास्टिक प्लेट्सचा वापर केला. प्रत्येक भांड्यात त्यांनी चंद्रावरील साधारण 1 ग्रॅम माती भरली. त्यानंतर पोषक द्रावणाने ती ओलसर केली. मग संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या अरेबिडोप्सिस प्रजातीतील वनस्पतीच्या काही बिया त्यात टाकल्या. चंद्रावरील या मातीत लागवड केलेल्या जवळजवळ सर्वच बियांना अंकुर फुटले आणि शास्त्रज्ञानांच्या प्रयत्ना यश आले.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शसतरजञन #मठ #यश #चदरवरन #आणललय #मतत #रप #उगवल #पह #कस #त

RELATED ARTICLES

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट, पेशंट बिल पाहून….

हॉस्पिटलचं बिल पाहून आकडी येईल.... ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

Most Popular

Congress : आधी चिंतन शिविर आता भारत जोडो आभियान, काँग्रेस कमबॅक करणार?

<p>Congress : आधी चिंतन शिविर आता भारत जोडो आभियान, काँग्रेस कमबॅक करणार?</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

उन्हाळ्यामुळे केसांची हालत झालीय खराब? या 6 टिप्स वापरून मिळवा नॅचरल शाईन

मुंबई, 21 मे : कडक उन्हाळा सुरू असल्याने त्वचेसह केसांशी संबंधित समस्याही सुरू होतात. कडक सूर्यप्रकाशामुळे केस कोरडे आणि निस्तेज होतात, तर घामामुळे...

“काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?”

मुंबई, 21 मे : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने (BJP) आगामी 2024 च्या निवडणुकीची (2024 Lok Sabha Election) तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे...

कोरोनानंतर भारतावर आता Monkeypox चा धोका; मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई : काही देशांमध्ये नवा संसर्ग मंकीपॉक्सचं प्रमाण वाढताना दिसतंय. यानंतर आता भारतातही खबरदारीचे उपाय सुरू झाले आहेत. त्यामुळे आता परिस्थितीवर बारकाईने लक्ष...