Thursday, December 2, 2021
Home मुख्य बातम्या शहरी नक्षलवाद प्रकरण : प्राध्यापक हॅनी बाबू यांची रवानगी ब्रीच कँडीतून पुन्हा...

शहरी नक्षलवाद प्रकरण : प्राध्यापक हॅनी बाबू यांची रवानगी ब्रीच कँडीतून पुन्हा तळोजा कारागृहात<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : शहरी नक्षलवाद प्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हॅनी बाबू यांची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात आली आहे. हॅनी यांना डोळ्यांचा संसर्ग झाल्यानं मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा झाल्यानं 18 ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांना पुन्हा तळोजा कारागृहात नेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत.</p>
<p style="text-align: justify;">भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी प्राध्यापक हॅनी बाबू यांच्यावरही कारवाई करण्यात आली. तळोजा कारागृहात असतानाच मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी आधी जे.जे. रुग्णालयात व नंतर जी.टी. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. त्यानंतर तिथून त्यांना ब्रीच कँण्डी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं. बाबू यांना डोळ्यांचा गंभीर संसर्ग झाल्यामुळे त्यांची पत्नी जेनी रोवेना यांनी मुंबई उच्च न्यायालयात बाबू यांना वैद्यकीय कारणांसाठी अंतरिम जामीन मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.</p>
<p style="text-align: justify;">हॅनी बाबूंच्या डोळ्यांच्या संसर्गामध्ये आता बरीच सुधारणा झाली असली तरीही त्यांच्या डोळ्यातून किंचित पाणी येत आहे तसेच सुजही आहे. अशी माहिती बाबूंच्यावतीने अॅड. पायोशी रॉय व अॅड. युग चौधरी हायकोर्टाला दिली. तसेच ब्रीच कँडी रुग्णालयानंही हॅनी बाबूंचा वैद्यकीय अहवाल कोर्टापुढे सादर केला. तेव्हा त्यांच्या तब्येतीत झालेली सुधारणा पाहता गरज भासल्यास नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात नेण्याच्या सूचना देत हायकोर्टानं त्यांची याचिका निकाली काढत हॅनी बाबूंना पुन्हा तळोजा कारागृहात हलवण्याचे निर्देश दिले आहेत.</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शहर #नकषलवद #परकरण #परधयपक #हन #बब #यच #रवनग #बरच #कडतन #पनह #तळज #करगहत

RELATED ARTICLES

WhatsAppची 20 लाखांपेक्षा अधिक भारतीय अकाउंटवर बंदी, जाणून घ्या या मागील कारण

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे फेसबुकच्या सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ऍपपैकी एक आहे. व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता इतकी आहे की, भारतच काय तर संपूर्ण देशात याचे युजर्स...

केंद्राच्या आक्षेपानंतर राज्य सरकारने विमान प्रवासाचे नियम बदलले

मुंबई, 2 डिसेंबर : कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारकडून विमान प्रवासासाठी नियमावली जारी करण्यात आली...

Omicron पासून बचावासाठी शास्त्रज्ञांनी सांगितले सहा सोपे उपाय, तुम्हीही लक्षात ठेवा

मुंबई : जगातील 20 हून अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार पोहोचला आहे. या प्रकाराचं नाव Omicron असल्याचे सांगिकले जात आहे. जो...

Most Popular

कोरोना व्हायरस स्वतःमध्येच कसा करतो बदल?

जगासाठी कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रोन व्हेरिएंट, चिंतेचं कारण बनलं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

VIDEO गैरसमजूतीतून इराणी सैनिक आणि तालिबानी सैनिक यांच्यात हिंसक संघर्ष

तेहरान, 2 डिसेंबर: अफगाणिस्तानवर (Afghanistan Crisis) तालिबान्यानी(Taliban Government) कब्जा केल्यापासून दररोज दहशतवादी हल्ले होत आहेत. दरम्यान, अफगाणिस्तान-इराण सीमेवर इराणी सैनिक आणि तालिबानी सैनिकांमध्ये...

Google Pixel 6 : युजर्स करताहेत तक्रार, हा स्मार्टफोन होत नाहीये चार्ज, पाहा डिटेल्स

हायलाइट्स:Google Pixel 6 सीरिजने वाढविली युजर्सची डोकेदुखी Google Pixel 6 चार्ज होत नसल्याचे युजर्सचे म्हणणे युजर्स करत आहेत हेल्प फोरमवर तक्रार नवी...

IND vs NZ: मुंबईतील दुसरी टेस्ट होणार नाही?

 भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच 3 डिसेंबर 2021 पासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

अभद्र युती तोडण्याची संधी..

ज्युलिओ एफ. रिबेरो पोलीस आणि राजकारणी यांना पैसा बेकायदा कृत्ये करणाऱ्यांचा.. या परिस्थितीने गाठलेल्या तळातून आपण वर येणार का? भारतीय पोलीस सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी...