Monday, July 4, 2022
Home करमणूक शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला अखेर जामीन

शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला अखेर जामीन


मुंबई, 21 जून:  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी ( Ketaki Chitale) चितळेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणी केतकी विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ठाणे कोर्टात सुनावणी पार पडली आणि अखेर केतकी चितळेला या प्रकरणात ठाणे कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. (ketaki chitale granted bail)   याआधीही याच प्रकरणी कळंबोली पोलिसांनी केतकीला जामीन दिला होता.  शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर केतकीला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिचा कोठडीतील मुक्काम वाढतच गेला. गेली अनेक दिवस केतकी जामीनासाठी प्रयत्न करत होती. अखेर तिला या प्रकरणात जामीन मिळाला आहे.

त्याचप्रमाणे केतकी चितळेवर अॅट्रोसिटी प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणातही ठाणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.  केतकीने 1 मार्च 2020मध्ये केलेल्या वादग्रस्त पोस्टप्रकरणी तिच्या अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवबौद्ध लोक 6 डिसेंबरला मुंबई दर्शनाला येतात अशा प्रकारचा मजकूर असलेली पोस्ट तिनं शेअर केली होती.

हेही वाचा – भाजपची पडद्यामागची बॅटिंग संपली, आता थेट मैदानात, प्रदेशाध्यक्ष मोर्चेबांधणीसाठी गुवाहाटीत, पुढची रणनीती तयार
अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं होतं. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट लिहीली होती. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये  153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातही केतकीवर गुन्हा दाखल झाल्यानं केतकी चितळे चांगलीच अडचणीत आली होती.
केतकी चितळे याआधीही तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आली होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हा आणि तक्रारी दाखल होण्याची ही पहिलीच वेळ होती. आधी शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे आणि त्यानंतर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानं केतकीला अनेक दिवस कोठडीत काढावे लागले. परंतू आता दोन्ही प्रकरणात केतकीला जामीन मंजूर झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#शरद #पवरबबत #कललय #आकषपरह #पसट #परकरण #कतक #चतळल #अखर #जमन

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...