Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या शरद पवारांनी थेट गाठलं वर्षा; उद्धव ठाकरेंना म्हणाले, मुख्यमंत्रिपद सोडा...

शरद पवारांनी थेट गाठलं वर्षा; उद्धव ठाकरेंना म्हणाले, मुख्यमंत्रिपद सोडा…


मुंबई, 22 जून : उद्धव ठाकरेंनी काही वेळापूर्वी फेसबुक लाइव्हच्या (Uddhav  Thackeray) माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यानंतर महाराष्ट्राचे महाचाणक्य शरद पवार यांच्याशीही उद्धव ठाकरेंनी संपर्क केला. सत्ता वाचवण्यासाठी काय करता येईल, याबाबत सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये खलबतं सुरू आहेत.

यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar) उद्धव ठाकरेंना मोलाचा सल्ला दिल्याचं सांगितलं जात आहे. सत्ता वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, असा सल्ला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या फेसबुक लाइव्हमध्येही उद्धव ठाकरेंनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो असं भावनिक आवाहन केलं होतं. दरम्यान शरद पवारांनाही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा असं सांगितलं आहे.

अडीच वर्षांपूर्वी शरद पवारांच्या आग्रहावरुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर आज पवारांनी त्यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याचा सल्ला दिला आहे.

एकनाथ शिंदेंकडे सध्या शिवसेनेच्या 29 आमदारांच्या सह्या आहेत. मात्र कायद्यानुसार सत्तास्थापनेसाठी शिवसेनेच्या किमान 37 आमदारांची गरज असते. त्यामुळे अद्याप शिंदेंकडूनही सत्तास्थापनेसाठी कोणताही दावा करण्यात आलेला नाही.

उद्धव ठाकरेंची भावनिक साद…
शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरे (Uddhav  Thackeray) सरकार अल्पमतामध्ये आल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी जनतेशी भावनिक साद घातली. हा उद्धव ठाकरेंचा शेवटचा डाव होता. या फेसबुक लाइव्हनंतर एकनाथ शिंदेंच्या निर्णयात काही बदल होतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, समोर येऊन माझ्याशी संवाद साधा. आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो. संध्याकाळी बंडखोरी केलेल्या आमदारांनी यावं. मला खुर्चीचा कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे माझ्याकडे  अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळही माझ्यासाठी गौण आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

  • बंड विरुद्ध संघर्ष; उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या डावानंतर संजय राऊतांचं ते ट्विट व्हायरल!

    बंड विरुद्ध संघर्ष; उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या डावानंतर संजय राऊतांचं ते ट्विट व्हायरल!

  • आमदारांनंतर आता खासादाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र, शिवसेना पक्षप्रमुखांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न

    आमदारांनंतर आता खासादाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र, शिवसेना पक्षप्रमुखांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न

  • वर्षाचा कर्मचारी हात जोडून मुख्यमंत्र्यांसमोर उभाच राहीला, भावुक करणारा तो Video 

    वर्षाचा कर्मचारी हात जोडून मुख्यमंत्र्यांसमोर उभाच राहीला, भावुक करणारा तो Video 

  • शिवसेनेचा ढाण्या वाघ गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना जावून मिळाला, हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा Exclusive Video समोर

    शिवसेनेचा ढाण्या वाघ गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना जावून मिळाला, हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा Exclusive Video समोर

  • उरले सुरले आमदारही एकनाथ शिंदेंच्या गोटात, तरीही उद्धव ठाकरे फ्लोर टेस्टसाठी तयार, काँग्रेसचा मोठा दावा

    उरले सुरले आमदारही एकनाथ शिंदेंच्या गोटात, तरीही उद्धव ठाकरे फ्लोर टेस्टसाठी तयार, काँग्रेसचा मोठा दावा

  • शरद पवारांनी थेट गाठलं वर्षा; उद्धव ठाकरेंना म्हणाले, मुख्यमंत्रिपद सोडा...

    शरद पवारांनी थेट गाठलं वर्षा; उद्धव ठाकरेंना म्हणाले, मुख्यमंत्रिपद सोडा…

  • मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला शिंदेनी दिलं इमोशनल उत्तर! म्हणाले, बाळासाहेब....

    मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला शिंदेनी दिलं इमोशनल उत्तर! म्हणाले, बाळासाहेब….

  • ठाकरे सरकारसाठी गुरूवार ठरणार निर्णायक, राष्ट्रवादीच्या बैठकीत होणार मोठा निर्णय!

    ठाकरे सरकारसाठी गुरूवार ठरणार निर्णायक, राष्ट्रवादीच्या बैठकीत होणार मोठा निर्णय!

  • Shocking Video : नेत्याच्या दु:खात शिवसैनिक उतरले रस्त्यावर; राडा घालणाऱ्या महिला ढसाढसा रडल्या

    Shocking Video : नेत्याच्या दु:खात शिवसैनिक उतरले रस्त्यावर; राडा घालणाऱ्या महिला ढसाढसा रडल्या

  • 'महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणं गरजेचं', मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आक्रमक

    ‘महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणं गरजेचं’, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आक्रमक

  • '...तर मुख्यमंत्र्यांवर ही मोठी नामुष्की', पवार-ठाकरे भेटीत नेमकी चर्चा काय?

    ‘…तर मुख्यमंत्र्यांवर ही मोठी नामुष्की’, पवार-ठाकरे भेटीत नेमकी चर्चा काय?

Published by:Meenal Gangurde

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#शरद #पवरन #थट #गठल #वरष #उदधव #ठकरन #महणल #मखयमतरपद #सड

RELATED ARTICLES

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासोबतच हँड सॅनिटायझरचा इतक्या कामांसाठी करा स्मार्ट उपयोग

मुंबई, 02 जून : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण हँड सॅनिटायझर वापरतो. सॅनिटायझरमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत होते. कोरोनामुळे अलिकडे सर्वांना सॅनिटायझरचे...

Most Popular

State Wrestling Association : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

<p class="title style-scope ytd-video-primary-info-renderer">State Wrestling Association : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त</p> <p id="info" class="style-scope ytd-video-primary-info-renderer">&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

Wrong Fruit Combination : सावधान, फळांसोबत ‘हे’ 5 पदार्थ खाल्ल्यास पोटात बनतं विष, चुकूनही एकत्र खाऊ नका, जीव येईल धोक्यात..!

फळे ही अशी गोष्ट आहे जी पृथ्वीवरील सर्वात आरोग्यदायी आणि शक्तिशाली गोष्ट मानली जाते. आरोग्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची जीवनसत्त्वे (vitamins) आणि खनिजे...

पंतच्या शतकाने इंग्लंडचा अहंकार मोडला आणि जागा झाला ‘इंद्रानगरचा गुंड’

बर्मिंगहॅम: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने १०० धावांपर्यंत ५ विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर ऋषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या समाचार घेतला....

Dhule : एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात धुळे जिल्ह्यातून ‘या’ दोन नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी?

Maharashtra Political Crisis : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला...

Nashik Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यातील 567 कोटींच्या कामांना ब्रेक, भुजबळांना दणका

Nashik Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा सपाटा लावला आहे. सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला झटका...